Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात बायोगॅस प्रकल्प सुरू

  


पंढरपूर - ( टिम कृषीदीप न्यूज )

धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात बायोगॅस व सीएनजी चे उत्पादन सुरू झाले असल्याचे कारखान्याचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी माहीती दिली...





धाराशिव साखर कारखाना नेहमी चर्चेत आणि नवनवीन उपक्रम राबवून सामाजिक कार्यात पुढाकार घेणारा कारखाना म्हणून ओळख आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये इथेनॉल प्लांट बंद करून देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प याच धाराशिव साखर कारखान्यामध्ये यशस्वी झाला होता आणि आता काळाची गरज ओळखून बायो-सीएनजी गॅसचे उत्पादन कारखाना प्रशासन घेत आहे याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


धाराशिव कारखान्यात डिसलेरी प्रकल्पातू स्पेंट वॉश पासून बायोगॅसची निर्मिती होत आहे.एका दिवसाला बायोगॅस जवळपास 20हजार m³ उत्पादन घेऊन सीएनजी जवळपास 10 मॅट्रिक टनाचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. बाॅयलरला बायोगॅस दिल्याने बगॅसची बचत होत आहे. त्यातूनच पुरक प्रदुषण मुक्त वातावरण निर्माण होत असल्याचे असे श्री.अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले.

यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, शिवसेनेचे नेते आतिश पाटील, पंढरपूर बार असोशिएशन अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील, कारखान्याचे जनरल मॅनेजर आयुबखान पठाण, इंजनिअर देशमुख, प्रविण बोबडे, बाबासाहेब वाडेकर, पेठे, दयानंद गव्हाणे, डिसलेरी मॅनेजर ज्ञानेश्वर कोळगे यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement