पंढरपूर - ( टिम कृषीदीप न्यूज )
गादेगाव विकास सेवा सोसायटी नं.2 ची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली.या सोसायटीच्या चेअरमन व व्हा. चेअरमनपदाची निवडणुक बुधवार दिनांक 17 रोजी सहाय्यक निबंधक(सहकार) पंढरपूर यांच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ए.एस. महारनवर यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडली. चेअरमनपदासाठी शिवाजी शिंदे यांची तर व्हा. चेअरमनपदी सुधाकर बागल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गादेगाव नं. 2 विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी संस्था मर्या. गादेगाव, तालुका पंढरपूरची पंचवार्षिक 2022-2023 ते 2027-2028 या कालावधीची संचालक पदाची निवडणूक 3 मे रोजी बिनविरुध्द झाली होती.या सोसायटीच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवडणूक बुधवार दि. 17 रोजी घेण्यात आली. या निवडणूकीमध्ये चेअरमन पदासाठी शिवाजी मारुती शिंदे यांचा तर व्हा.चेअरमन पदासाठी सुधाकर पांडुरंग बागल याचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी ए. एस. महारनवर यांनी चेअरमन पदासाठी शिवाजी मारुती शिंदे यांची व सुधाकर पांडुरंग बागल व्हा. चेअरमनपदी यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी संस्थेचे संस्थापक तथा खरेदी विक्रि संघाचे चेअरमन शांतीनाथ बाबुराव बागल, माजी चेअरमन पांडुरंग राजाराम बागल, माजी चेअरमन शंकर भिमराव बागल, खरेदी विक्रि संघाचे संचालक नवनाथ पोरे, संस्थेचे नवनिर्वाचित संचालक शशिकांत बागल, कुबेर बागल, अविनाश बागल, कांतीलाल बागल, संतोष बागल, किरण शेंडगे, अरुण कांबळे, बाळु कदम, दत्तात्रय कोळी, प्रियंका मिलिंद मोलाणे भोसले, द्रोपती नामदेव शेंडगे आदी उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ए.एस. महारनवर तर सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव शंकर कवडे यांनी कामकाज पाहीले. बिनविरोध निवड झालेले चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे सत्कार शांतीनाथ बागल , पांडुरंग बागल व नवनाथ पोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

0 Comments