पंढरपूर : (टिम कृषीदीप न्यूज )
गेल्या महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध (महाराष्ट्र टॅलेन्ट सर्च) परीक्षेत येथील अरिहंत क्लासचे तक्ष राऊत व मृणाल वलेकर हे दोन विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पंढरपूर केंद्रातून या परीक्षेत एकूण चार विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत. त्यापैकी अरिहंत क्लासचा तक्ष तुकाराम राऊत राज्यात 17 वा तर कु. मृणाल मुकूंद वलेकर राज्यात 18 वे स्थान पटकावून त्यांनी सुयश संपादन केले आहे. त्यांना विना व्होरा यांचे मार्गदर्शन लाभले. तक्ष राऊत हा कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये तर कु, मृणाल वलेकर ही आदर्श प्राथमिक विद्यालयात इयत्ता 3 री मध्ये शिकत आहे.


0 Comments