पंढरपूर- ( टिम कृषीदीप न्यूज )
भंडीशेगांव ता.पंढरपूर येथे तत्कालीन उपविभागीय अधिकारी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे उपायुक्त सचिन ढोले व सह्याद्री हॉस्पिटलचे लिव्हर प्रत्यारोपण तज्ञ डॉ.बिपीन विभूते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा येलमार उपस्थित होत्या.
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, उन्हाळ्यात सावलीची गरज असते तशेच प्रत्येकाला ऑक्सिजन ची गरज असते, कोरोना च्या भीषण महामारी मध्ये कित्येक लोक ऑक्सिजन न मिळाल्याने मरण पावले,वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून समाज हिताच्या गोष्टीना प्राधान्य दिले पाहिजे,तत्कालीन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी पालखी महामार्गावर खूप मोठे काम केले होते तसेच डॉ.बिपीन विभूते यांनी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मागील पाच वर्षात तीनशे पेक्षा जास्त रुग्णाचे लिव्हर प्रत्यारोपण ची शस्त्रक्रिया करून जागतिक पातळीवर काम केले आहे म्हणून आश्या कर्तृत्ववान व्यक्ती च्या वाढदिवस हा वृक्षारोपण करून साजरा करत असल्याचे मत यावेळी भाजपा वैद्यकीय सेल चे तालुका अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार यांनी व्यक्त केले.
भंडीशेगांव येथे मागील सात वर्षांपासून मुबई येथील उद्योजक अजित कंडरे यामी वृक्षारोपण ची चळवळ उभी केली आहे. प्रत्येक वाढदिवस हा वृक्षारोपण करून साजरा केला जात आहे, संपूर्ण गावात वृक्ष लागवड केली आहे, अजित कंडरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेचाळीस एकरवर वृक्षारोपण केले आहे, तसेच संपूर्ण गावात,बुद्ध पार्क,तसेच शाळेच्या आवारात मोट्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे अशी माहिती माजी उपसरपंच संतोष ननवरे यांनी दिली.
वृक्षारोपण साठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मंगेडकर,पोलीस कॉन्स्टेबल वामन येलमार,संजय येलपले,माजी उपसरपंच संतोष ननवरे,अनिल विभूते,दऱ्याप्पा मंगेडकर,पंचायत समिती सदस्य पल्लवी येलमार,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक बाळासाहेब काळे,श्रीनाथ विद्यालय चे मुख्याध्यापक विश्वजित माने,गणेश पाटील,सावता ननवरे,मंगेश ननवरे,माजी उपसरपंच विश्वास सुरवसे, सतीश रणखांबे,शंकर घाडगे,जगन ननवरे,भाजपा वैद्यकीय सेल चे तालुका अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार सह ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments