पंढरपूर- (टिम कृषीदीप न्यूज )
पुरूषांच्या बरोबरीने शेतीमध्ये काम करणा-या महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व त्या पध्दतीने खतांचा वापर करून एकरी उत्पादन वाढीसाठी वसंतदादा शुगर इस्टिटयुट मांजरी बु//,पुणे यांनी राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी महिलांसाठी मंगळवार दि.२०/१२/२०२२ ते शुक्रवार दि.२३/१२/२०२२ या चार दिवसाचे निवासी मार्गदर्शन, शिबीर आयोजित केले आहे.
महिला ऊस उत्पादक शेतक-यांना श्रमाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणून सहकार शिरोमणी कारखान्याच्या वतीने मुक्ताई महिला आदर्श ऊस उत्पादक शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली आहे. या गटातील महिलांना हंगामनिहाय सुधारीत ऊस जातीचे नियोजन त्रिस्तरीय पध्दतीने बेणे निवड करणे, आंतरपीक घेताना योग्य् पिकांची निवड करणे, पाण्याचे नियोजन करणे, संतुलित खतांचा वापर करणे, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करणे, रासायनिक तणनाशकांचा अंतर्भाव करून ऊसातील तणावर नियंत्रण करणे, ऊस उत्पादकता वाढी बरोबरच कमी खर्चात उत्पादन वाढविणे इ.माहिती कारखान्याचे वतीने मोफत देण्यात येत असून, त्याचाच एकभाग म्हणून कारखान्याचे वतीने महिला ऊस उत्पादकांना वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट ,पुणे येथील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबीरास पाठविण्यात आले असल्याची माहिती चेअरमन कल्याणराव काळे दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट यांच्या वतीने प्रति वर्षी महाराष्ट्रातील ऊसाची व साखरेची उत्पादकता वाढीसाठी ऊस शेती ज्ञानयाग, ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण इ. विविध शिबीर व मेळावे आयोजित करण्यात येत असून, यंदाही राज्यातील सर्व महिला ऊस उत्पादक शेतक-यांसाठी दि.२० ते २३ डिसेंबर २०२२ या कालावधीत व राज्यातील सर्व पुरूष ऊस उत्पादक शेतक-यांसाठी विभागवार दि.२७ डिसेंबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास कारखान्याचे मुक्ताई महिला आदर्श ऊस उत्पादक शेतकरी गटातील बहुसंख्य् महिलांनी सहभाग नोंदविला असून, सदर शिबिरास प्रशिक्षणासाठी पाठविण्यासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशिक्षणार्थी महिला ऊस उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments