पंढरपूर- प्रतिनिधी
दि पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे सहकार सप्ताहाचे औचित्य साधुन कै.देशभक्त बाबुराव जोशी व्याख्यानामालेेचे आयोजन दि.18 ते 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत कवठेकर प्रशाला, नाथ चौक, पंढरपूर येथे करणेत आल्याची माहिती बँकेचे व्हा.चेअरमन दीपक शेटे यांनी दिली.
याप्रसंगी माहिती देताना ते म्हणाले, पंढरपूर अर्बन बँक यावर्षी 111 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सभासद, ग्राहक, हितचिंतक यांचे विविध प्रश्नांवर विचार मंथन होवुन समाजप्रबोधन व्हावे यासाठी कोविड 19 लॉकडाऊनचे दोन वर्षाचे कालावधीनंतर यावर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करणेत आले आहे. सदर व्याख्यानमालेचा शुभारंभ उद्घाटन समारंभ शुक्रवार दि.18 नोव्हेंबर 2022 रोजी सायं.6.00 वाजता करणेत येणार असून समारोप रविवार दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी मा.श्री.कुंदन भोळे-जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, सोलापूर यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे. तसेच त्यावेळी पंढरपूर अर्बन बँक पुरस्कृत मध्यवर्ती गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाचा नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव व नवरात्रोत्सव 2022 मधील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या मंडळाना पारितोषिक वितरण समारंभ मा.आ.प्रशांत परिचारक यांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर व्याख्यानमालेमध्ये शुक्रवार दि.18 नोव्हेंबर रोजी मिरज येथील प्रसिध्द श्वसनविकार तज्ञ-डॉ.अनिल मडकी यांचे “कोरोना नंतरचे जीवन-काळजी व सुरक्षितता”, शनिवार दि.19 नोव्हेंबर रोजी पुणे येथील परराष्ट्रनीतीचे गाडे अभ्यासक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांचे “भारतीय पराराष्ट्र नीतीची 75 वर्षे” व रविवार दि.20 नोव्हेंबर रोजी सुप्रसिध्द अभिनेता श्री.प्रवीण तरडे यांचे “मराठी चित्रपट सृष्टी” याप्रमाणे व्याख्यान आयोजित केले आहे. सदर व्याख्यानमाला कवठेकर प्रशाला, नाथ चौक, पंढरपूर येथे दररोज सांयकाळी 6.00 वाजता आयोजित केला आहे. या व्याख्यानमालेस उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन बँकेच्या संचालक मंडळीच्या वतीने करण्यात येत आहे.
याप्रसंगी बँकेचे व्हा.चेअरमन दीपक शेटे, बँकेचे संचालक रजनीश कवठेकर, उदय उत्पात, हरिष ताठे, चंद्रकांत निकते, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, भाऊसाहेब जगताप, सोमनाथ होरणे, सौ.रेखाताई अभंगराव, सौ.माधुरीताई जोशी, मुन्नागीर गोसावी, मनोज सुरवसे, तज्ञ संचालक राजेंद्र बजाज, प्रकाश कुलकर्णी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, सरव्यवस्थापक राम उन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
_____________________________________________
दि.18 नोव्हेंबर 2022 रोजी मा.डॉ.अनिल मडकी, मिरज विषय-‘कोरोना नंतरचे जीवन-काळजी व सुरक्षितता’
दि.19 नोव्हेंबर रोजी मा.डॉ. शैलेंद्र देवळाणकर, पुणे विषय-‘भारतीय परराष्ट्र नीतीची 75 वर्षे’,
दि.20 नोव्हेंबर रोजी मा.श्री.प्रवीण तरडे, मुंबई विषय-‘मराठी चित्रपट सृष्टी’,
स्थळ : कवठेकर प्रशाला, नाथ चौक, पंढरपूर दररोज सांय.6.00 वाजता
______________________________________________

0 Comments