सोलापुर - ( टीम कृषी दीप न्यूज )
खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या अकोला येथील भारत जोडो यात्रेत १६ ते १८ नोव्हेंबरला सोलापुर जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सह महाविकास आघाडीतील घटकपक्ष आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह या यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत. अशी माहिती सोलापुर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम बर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी शासकीय विश्रामगृह सोलापुर येथील पत्रकार परिषदेस माहिती दिली.
याबाबत महाविकास आघाडीने तयारीही सुरु केली असल्याची माहिती महाविकास आघाडी नेते मंडळीनी दिली.
या पत्रकार परिषदेस सोमपा गतनेते चेतनभाऊ नरोटे, शिवसेना शहर अध्यक्ष विष्णु कारमपुरी, माजी महापौर संजय हेमगड्डी, मनोहर सपाटे, राष्ट्रवादीचे नेते महेश गादेकर, काँग्रेसचे प्रसिद्धि प्रमुख तिरुपती परकीपंडला, प्रमोद भोसले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments