Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

अवैध वाळू उपसा करणाऱ्या 11 होड्या फोडल्या पंढरपूर महसूल प्रशासनाची कारवाई तहसिलदार- सुशिल बेल्हेकर

 

 

 

 

         पंढरपूर दि.31:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात  पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने  अवैध वाळू व वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या 11 सुमारे 11 लाख रुपयांच्या होड्यांची कटरच्या सहाय्याने तोडफोड करुन पुर्णपणे नष्ट करण्यात आल्या असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध  वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी पथकाची  नेमणूक केली आहे. भीमा नदी पात्रातील  पंढरपूर, व्होळे चिंचोली, इसबावी,भटुंबरे,शिरढोन हद्दीत  लाकडी होड्याव्दारे अवैध वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली. 

सोमवार  दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता यांत्रिक बोटव्दारे भीमा नदी पात्रात महसूल पथकास पाठवून   भीमा नदी पात्रातील 11 होड्या पकडून कटरच्या सहाय्याने तोडफोड करुन  पुर्णपणे नष्ट करण्यात आल्या. ही कारवाई सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरु होती. भीमा नदीपात्रातील पाणीपातळी मागील दिवसांपासून कमी झाल्याने महसूल पथकाव्दारे नदी पात्रात गस्त सुरु होती. या पथकाचा सुगावा लागताच  अवैध वाळू उपसा करणारे होडी चालक पसार होत होते. महसूल प्रशासनाने यांत्रिक बोटीच्या सहाय्याने थेट नदीपात्रात होड्या पकडून कारवाई केली असल्याची माहिती तहसिलदार बेल्हेकर यांनी दिली. या पथकात मंडलाधिकारी विजय शिवशरण, तलाठी प्रशांत शिंदे, राजू वाघमारे, दत्ता कोथाळकर, चांदकोठे कोतवाल तानाजी लोंढे सहभागी होते.

000000000


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement