प्राचार्य सिकंदर ढवळे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार समारंभ सोहळा
पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर शहराच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून प्राचार्य सिकंदर ढवळे यांनी मोठे योगदान दिले आहे. स्व. शिवराम ढवळे गुरुजी आणि स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे अनेक वर्षाचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. ढवळे गुरुजींनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबाला शिक्षण दिले. सुसंकृत पिढी घडवली. गुरुंजीची मुले नोकरीला लागली. आणि खर्या अर्थाने फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराचा वसा घेवून शहरातील सर्व परिवर्तन चळवळीमध्ये यांच्या कुटूंबियांनी मोठे योगदान दिले असल्याचे गौरोद्गार माजी आ. प्रशांत परिचारक यांनी काढले.
प्राचार्य डॉ. सिकंदर ढवळे यांचा सेवानिवृत्ती गौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. त्यांच्या हितचिंतकांनी,मित्र परिवारांनी आयोजित केलेल्या या कार्याक्रमात माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते डॉ. ढवळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिचारक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महामंडळाचे मा. अध्यक्ष प्राचार्य सुभाषराव माने होते. तर प्रमुख पाहुणे शिक्षक आ.प्रा. जयंत आसगावकर , सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे होते. दै. लोकमत चे संपादक संजय आवटे,सो.जि.मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्रा. महेश सरवदे,कार्याध्यक्ष पी.जे.सावंत, उत्तम कोकरे ,आण्णासाहेब गायकवाड ,कालीदास कवडे,इंदिरा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वैभव साळुंखे सर, माजी नगरसेवक गणेशभाऊ अधटराव, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव, माजी नगरसेवक बालाजी मलपे, माजी नगरसेवक सनी मुजावर ,महादेव शिंदे, गहिनीनाथ शिंदे पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात पत्रकार संजय आवटे म्हणाले की, भारत हा देश कुठल्या एका नेत्याचा नाही तर हा देश सर्वसामान्य माणसाचा आहे. सर्व सामान्य हा या देशाचा केंद्रबिंदु आहे. प्रत्येक माणसाला बोलण्याची ताकद मिळाली, प्रत्येक माणसाला बोलण्याचे स्वातंत्र मिळावे यासाठी आपणास काम करावे लागेल. नागपूरच्या दलित समाजातील एका डॉक्टराला पद्मश्री भेटते. अतिउच्च स्तरावर जाऊन तो पोहचतो हे आजच्या काळात शक्य आहे का? याची मला चिंता वाटते. हा मुद्दा जातीचा नाही, धर्माचा नाही तर शोशित वंचित लोकांचे काय करायचे हा आहे. बाकी लोकांना काय करायचे ते करु द्या. मात्र चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या बाजुचीच भूमिका घेतली पाहिजेत. सगळेच लोक, सगळेच राजकारणी सामान्यांची बाजू घेतील शअसे नाही. यासाठी मला सर्वसामान्य लोक हा केंद्रबिंदु आहे असे वाटते. सर्वसामान्यांची सत्ता यासाठी असणे गरजेचे आहे. पुर्वी विकासाचा केंद्र बिंदु सर्वसामान्य माणूस होता. म्हणून आपण इथेपर्यंत पोहोचलो. विकास विकास म्हणजे काय? तर देशात कोणत्याही नळाचे पाणी आपण डोळे झाकून पिऊ शकतो याला विकास म्हणायचे असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना प्रशांतराव परिचारक म्हणाले की, सिकंदर ढवळे यांनी सुध्दा शाळेची नोकरी सांभाळत मुख्याध्यापक पदापर्यंतचा प्रवास आणि दुसर्या बाजुला सामाजिक परिवर्तनाची चळवळ, या दोन्ही माध्यमातून त्यांनी काम करण्यांचा निर्णय घेतला. अगदी निवृत्तीच्या कालखंडात देखील त्यांनी डॉक्टरेट मिळवली. आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग्य मान मला मिळत गेला. याचे कारण म्हणजे आमचे आणि यांच्या कुटुंबाचे 40 वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत. वडीलांनी केलेले संस्कार, त्या संस्काराच्या जोरावरती समाजामध्ये ढवळे कुटुंबियाने चांगले नाव कमावले आहे. सेवानिवृत्ती हा आयुष्यामधला हा पुर्ण विराम नाही तर स्वल्प विराम आहे. तुमच्या वाट्याला आलेले कर्म तुम्ही व्यवस्थित रित्या सहीसलाम पुर्ण केलेले आहे. कुठलाही डाग न लागू देता निवृत्त होणे सद्याच्या काळात अवघड आहे. कारण संस्था चालक त्यांचे असणारे इंटरेस्ट आणि सगळ्यात अडसर असतो तो मुख्याध्यापक. कारण मुख्याध्यापक असे पद आहे की शिक्षकाचेही समाधान करावयाचे आहे आणि संस्थापकाचीही मर्जी सांभाळायची आहे. अशा परिस्थितीमध्ये ढवळे सरांनी प्रामाणिकपणे काम केले. अनेक चांगले विद्यार्थी घडवले. यात त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना चांगली साथ दिली. या परिसरातील यशस्वी विद्यार्थ्यांना एकत्रीत आणणे, ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात सहभागी होणे, विविध उपक्रमात सहभागी होणे, हे ते सातत्याने करत आले आहेत. या कामात ते अधिक झोकून देतील. राजकारणात सत्ता, पद हे येते जाते. जे नशिबात आहे. ते मिळणार आहे. कोणी अडवून ठेवू शकत नाही. त्यामुळे ते येत राहील. कुठलीही अपेक्षा करत असताना आपण चांगले काम करत राहावे, आपण ते केले आहे. इसबावी परिसरात पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेली मंडळी जास्त आहे. या लोकांना पंढरपूरचा जो जुना इतिहास आहे. त्या इतिहासात शिक्षक, राजकारणी, समाजसेवकांची परंपरा आहे. या परंपरेत इसबावी येथील लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. या मंडळीबरोबर ढवळे सर काम करत आहेत. या भागातील तरुणांबरोबर काम करत असताना त्यांना अधिक बळ मिळावे, यासाठी आपणाला निरोगी आयुष्य मिळावे, अशी आशा विठ्ठल चरणी करतो, अशी भावना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने इसबावी परिसरातील नागरीक व सिकंदर ढवळे यांचे मित्र मंडळी उपस्थित होते. प्रास्ताविक लहु कांबळे तर आभार मा.मुख्याध्यापक दशरथ दोडके यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे यांनी केले.
---------------------------------------------------------------------------

0 Comments