Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक पदी डॉ महेश पालकर यांची नियुक्ती.......

 

महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकपदी आदरणीय मित्रवर्य डॉ. महेश पालकर यांची नियुक्ती झाली त्याबद्दल अभिनंदन करताना पत्रकार मोहन जगताप मित्र परिवाराच्या वतीने पुणे येथे सत्कार समारंभ प्रसंगी प्राचार्य शौकत शेख. 
विस्तारअधिकारी भोसले साहेब .....
 सातारा  - टिम कृषीदीप न्यूज

राज्यातील ग्रामीण पातळीवर ते मुंबईत विविध ठिकाणी शैक्षणिक कामातून शिक्षक सेवेतून ते विविध उच्च पदावर काम केलेले डॉ. महेश पालकर यांची राज्याचा माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक पदावर निवड करण्यात आली..

                  साताऱ्याचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्याच्या योजना विभागाचे शिक्षण संचालक तसेच  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश पालकर यांची निवड झाल्याने सातारा जिल्ह्यासह राज्यातील शिक्षक वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे..

              डॉ. महेश पालकर यांनी चौदा वर्षे सातारा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक, तीन वर्षे निरंतर शिक्षणाधिकारी, चार वर्षे सातारा येथे शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथे चार वर्षे उपसंचालक, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे पाच वर्षे शिक्षण सहसंचालक, शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय येते एक वर्षे शिक्षण संचालक म्हणून काम पाहिले आहे. 

      विद्यार्थी व गुणवत्ता आणि नव साक्षरता अभियानासाठी त्यांनी देशात भरीव कामगिरी केली आहे. क्रीडा प्रबोधिनीच्या निवड चाचणी व विद्यार्थी लाभाच्या योजना विद्यार्थ्यां पर्यन्त पोहोचविण्याचे प्रयत्न त्यांनी केले. 

त्यांच्या निवडीबद्दल सातारा जिल्ह्यासह राज्यातून त्यांचे शिक्षण संस्था संचालक व शिक्षणप्रेमी व्यक्तीनी त्याचे या निवडीबद्दल अभिनंदन करीत आहेत.....

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement