आमदार अभिजीत पाटलांनी राखली परंपरा कायम शिवतीर्थावर यशस्वी व्याख्यानमालेचे आयोजन केले
पंढरपूरकरांनी दिला भरभरून प्रतिसाद
पंढरपूर - (टिम कृषीदीप न्यूज)
माढा आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय शिवव्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेमध्ये पहिल्या दिवशीचे व्याख्यान प्रा.गणेश शिंदे, दुसऱ्या दिवशी युवा व्याख्याते राहुल गिरी आणि तिसर्या दिवशी छत्रपती शिवरायांचा ज्वलंत इतिहास मांडणारे शाहीर डॉ.देवानंद माळी यांनी आपल्या शाहीरीतून महाराजांचा जीवनपट मांडला,असे हे विविध कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी माढा आमदार अभिजीत आबा पाटील, उद्योगपती श्री.सी.पी.आण्णा बागल, भैरवनाथ शुगरचे श्री.अनिल सावंत, पंढरपूर गटशिक्षणाधिकारी मारुती लिंगाडे, मध्यवर्ती शिवजन्मोत्सव अध्यक्ष नागेश जाधव, मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले, संभाजी ब्रिगेडचे काशीद रावसाहेब, दिनकर चव्हाण, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा संघटक सुधीर भोसले, नगरसेवक प्रशांत शिंदे, नगरसेवक धनंजय कोताळकर, नगरसेवक श्रीनिवास बोरगांवकर,श्री.अदित्य फत्तेपुरकर, नगरसेवक सतिश शिंदे, , काॅग्रेसचे शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी, समाजसेवक अरुण कोळी, अमित पवार, संतोष सर्वगोड तसेच इतर मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments