राजकीय पक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक
पंढरपूर (दि.08):- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीची प्रक्रिया राबविली जात असून, 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षाचे उमेदवार व अपक्षांनी आदर्श आचार संहितेचे पालन करुन, ही निवडणुक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि पारदर्शी पध्दतीने पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
252 पंढरपूर विधानसभा मतदार संघातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची व अपक्ष उमेदवार, प्रतिनिधींची बैठक प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे घेण्यात आली यावेळी उमेदवार व उमेवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी इथापे म्हणाले, दिनांक 10 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन उमेदवारांची नावे व चिन्हांसह तयार करण्यात येतील.या प्रक्रियामध्ये उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी हजर रहावे. ईव्हीम संदर्भात कोणती शंका राहू नये यासाठी पारदर्शक पद्धतीने कामकाज केले जाईल तसेच याबाबतची माहिती पुस्तिका सर्व उमेदवारांना देण्यात आली. तसेच अशा प्रकारे तयार मशीन्स स्ट्रॉगरूमला सीसीटीव्ही कॅमेरा व सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली सुरक्षितपणे ठेवल्या जातील. दिनांक 14 15 व 16 नोव्हेंबरला दिव्यांग आणि 85 वर्षावरील वृद्धांचे घरी जाऊन मतदान घेतले जाईल. यामध्ये मतदान अधिकारी व त्यांच्यासोबत उमेदवारांचे प्रतिनिधी असतील. उमेदवारांना हा कार्यक्रम तसेच यादी आगाऊ दिली जाईल.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडावी यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे. उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनी प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. सभा, पदयात्रा, रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच्या खर्चाचा दैनंदिन लेखा त्यांना उपलब्ध करून दिलेल्या विहित नमुन्यातील नोंदवहीमध्ये नियमितपणे लिहावा. तसेच मतदानापूर्वी तीन वेळा होणाऱ्या निवडणूक खर्च तपासणी प्रसंगी याबाबतचे रजिस्टर लेखे सादर करावेत. बॅनर, पोस्टर, पत्रके आदी प्रचार साहित्यांवर मुद्रकाचे व प्रकाशकाचे नाव प्रतींची संख्या छापावी. तसेच ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा उमेदवारांनी त्याबाबत मतदानापूर्वी तीन वेळा वृत्तपत्र, वृत्तवाहिनीवर जाहिरात प्रसिद्ध करावी .मतदान प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण व ओळखपत्र याबाबतही सूचना यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.इथापे यांनी दिल्या.
0000000000

0 Comments