रिपब्लिकन दिशा बैठकीचे आयोजन
पुणे - विशेष प्रतिनिधी
पुरंदर हवेली मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून रिपब्लिकन समाज विकासा पासुन वंचित राहिल्याने नाराज झालेल्या समाज बांधवांसाठी
रिपब्लिकन कार्यकर्ते सुरज गायकवाड यांच्या वतिन घेण्यात आलेल्या रिपब्लिकन दिशा बैठकीमध्ये सर्व समाज बांधव एकत्रीत येऊन खालील मागण्या पुरंदर हवेलीतील विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना सर्वानुमते समाजाच्या वतीने देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर खालील मागण्या मान्य करून पूर्ण करण्यास कटिबद्ध राहणाऱ्या उमेदवारास सर्व रिपब्लिकन समाज जाहीर पाठिंबा देणार असल्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला मागण्यामान्य न केल्यास एकाही उमेदवारास मतदान न करता नोटा बटन दाबून मताधिकार बजावला जाण्याचा ही ठराव या वेळी करण्यात आला
१)पुरंदर हवेली मतदारसंघातील अनेक दुर्बल घटक शिक्षणापासून वंचित असून सदर घटकांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणून साक्षर करण्यासाठी चे धोरण करण्यात यावे
२)पुरंदर हवेली मतदारसंघातील सर्व बुद्ध विहारांमध्ये ग्रंथालय उभारण्यात यावे
३) शैक्षणिक योजनेतून शासकीय शाळांना सेमी इंग्लिश माध्यम चालू करून शाळांचा विकास करण्यात यावा
४) समाजातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात एक अध्यायवत लायब्ररी उभारण्यात यावी
५) समाजातील सुशिक्षित तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी
६) महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ या महामंडळातून तरुणांना लघु उद्योगांसाठी अर्थसहाय्य मिळवून मिळून देण्यात यावी
७) दलित वस्ती सुधार योजनेतून दलित वस्त्यांचा विकास करण्यात यावा
८) पुरंदर हवेली मतदारसंघातील सर्व बुद्ध विहारांचं सुशोभीकरण करण्यात यावं
९)औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून महामार्ग विकासीकरण करण्यात यावे
१०)सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक व इतर सर्व धोरणांमध्ये समाजाचा विचार करण्यात यावा

0 Comments