पंढरपूर - (टिम कृषीदीप न्यूज )
उमा महाविद्यालय पंढरपूर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर हा दिवस75 वा संविधान दिन मोठ्या उत्साहात महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला . यावेळी माननीय प्राचार्य डॉक्टर धीरज कुमार बाड यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर नारायण लोखंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्राचार्य डॉक्टर धीरज कुमार बाड यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले . संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर दत्ता सलगर यांनी केले. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका खिलारे एस. डी यांनी मानले

0 Comments