Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भाविकांच्या सुविधेसाठी पाच आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना - प्रांताधिकारी सचिन इथापे

 


 पंढरपूर दि.09:  कार्तिकी यात्रा कालावधीत  श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची  गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यकती  तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा, स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे.  यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. भाविकांना  काही अडचणी आल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपर्क साधावा असे आवहन प्रांताधिकारी  सचिन इथापे यांनी केले आहे.

  कार्तिक वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने  कोणतेही गैरसोय होऊ नये  यासाठी  पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, नगरपालिका तसेच  मुख्य आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्र तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.

आरोग्य विभागामार्फत यासाठी  पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर येथे प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी मुबलक प्रमाणात औषधसाठा   उपलब्ध करण्यात आला आहे. सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून  दर्शन रांग ]पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर व मंदीर परिसर येथे वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. 


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement