पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज
उमा महाविद्यालय पंढरपूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व सौ.सरजुबाई बन्सीलाल बजाज रक्तपेढी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन उमा शिक्षण संकुलाचे कार्यवाह माजी प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन पर मनोगत व्यक्त करताना त्यांनी शंभर जणांमधून एक शूर असतो.हजार जणांमधून एक पंडित असतो. दहा हजारांमधून एक वक्त असतो.पण दान देणारा हा दुर्मिळ असतो परंतु तो सर्वश्रेष्ठ असतो असे प्रतिपादन केले . याप्रसंगी श्री शशिकांत दुनाखे यांनी १०६ वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार डॉ.मिलिंद परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड तसेच सौ.सरजुबाई बन्सीलाल बजाज रक्तपेढी पंढरपूर पदाधिकारी डॉ. सदानंद पाटील, बाळासाहेब कवडे, शिवाजी बागल,सौ वैशाली वाईकर,नारायण गानमोटे,आकाश मोरे, श्रीमती विजया कोरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. नारायण लोखंडे, प्रा. सिंधू खिलारे, तसेच महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
.
0 Comments