Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भाळवणी हायस्कूल मध्ये माता पालक सभेचे आयोजन

 


पंढरपूर - (टिम कृषीदीप )

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माता पालक मेळाव्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून पंढरपूर येथील डॉ.वर्षा दुरूगकर उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य  एस. डी. रोकडे होते. तर माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्राची माळवदे उपस्थित होत्या.  यावेळी डॉ .वर्षा दुरुगकर  यांनी "मोबाईलचा विद्यार्थ्यांवर होणारा दुष्परिणाम आणि पालकांची जबाबदारीची भूमिका" या विषयावर माहिती सांगितली.त्याचबरोबर आहाराचे महत्व व योग्य आहार याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सर्व माता-पालक व किशोरवयीन मुलींचेही समुपदेशन केले, त्यांचे प्रश्न व अडचणी यांचे निराकरण केले.  यावेळी विद्यालयातील शिक्षक  डी.एम.माने व विद्यार्थ्यांनी मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर एक लघु मुकनाटिका सादर केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय मनीषा नागणे  व शिल्पा गुळवे  यांनी केले. आभार उमादेवी नागटिळक  यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी भोसले  व निता विधाते  यांनी केले विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षिका यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement