Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

आयआयटी कॉम्प्युटर सेंटरला एमएससीआयटी नंबर एकचा पुरस्कार

 

पंढरपूर:- टिम कृषीदीप न्यूज
 येथील अरबूज मेंशन स्टेशन रोड, आयआयटी कॉम्प्युटर सेंटरला सर्वोत्कृष्ट संगणक संस्थेचा नंबर एकचा पुरस्कार महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या संचालिका वीणा कामथ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
   महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांची विभागीय मीटिंग 2023 हॉटेल चित्रा सोलापूर येथे झाली. एमएससीआयटी मध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश नोंदविले तसेच राज्यात सर्वाधिक प्रवेश नोंदवणाऱ्या पहिल्या तीन सेंटरच्या यादीत समावेश झाला. एमकेसीएल कृत विविध कोर्सेसच्या माध्यमातून वर्ष 2023 मध्ये संगणक साक्षरता आणि संगणकावर आधारित रोजगाराभिमुक व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये भरीव कामगिरी केली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व रोजगारक्षम युवा पिढी निर्मितीसाठी आणि इंडस्ट्री-रेडी असे कोर्सेस चालवून विद्यार्थ्यांना सक्षम केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल विश्वात प्रगती साधण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला. संगणक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे संचालक नितीन आसबे व सहकारी दत्ता कळकुंबे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  गेल्या 24 वर्षापासून पंढरपूर तालुक्यातील आयआयटी ही संस्था विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचे कार्य यशस्वीरित्या करीत आहे. यापूर्वीही अनेक पुरस्कार या संस्थेला मिळाले आहेत. याचे सर्व श्रेय विद्यार्थी पालक तसेच सहकारी दत्ता कळकुंबे, रोहिणी मांजरे, वैष्णवी पाटील, प्रतीक्षा चव्हाण यांनी दिलेल्या योगदानामुळे हे यश संपादित करू शकलो असे आयआयटी कॉम्प्युटर सेंटरचे संचालक नितीन आसबे यांनी सांगितले.
  यावेळी एमकेसीएलचे अतुल पतोडी, दीपक पाटेकर, सोलापूर एमकेसीएलचे रोहित जेऊरकर, हारून शेख,मलिक शेख,शिवानंद पाटील, विभागीय समन्वयक महेश पत्रिके, अतुल रानडे, विवेक देसाई व सोलापूर जिल्ह्यातील सर्व कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्राचे संचालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement