Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

श्री विठ्ठल कारखान्याचा ऊस गाळपात विक्रम २६दिवसात तब्बल दोन लाख टन गाळप

 

सोलापूर जिल्ह्यात अभिजीत पाटील यांनी फोडली ऊस दराची कोंडी

पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज

पंढरपूर, ता. दि.२७ नोव्हेंबर: पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने मागील ४५ वर्षातील ऊस गाळपाचे सर्व विक्रम मोडीत काढत अवघ्या २६ दिवसात २ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून कारखान्याच्या इतिहासामध्ये नवा विक्रम केला आहे. शिवाय २० वर्षांनंतर कारखाना पहिल्यांदाच पूर्णक्षमतेने चालवण्यात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व त्यांच्या संचालक मंडळांना यश आले आहे.

स्व.आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची धुरा त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्याकडे गेली असता भगीरथ भालके यांच्या गैरकारभारामुळे मतदान रुपी आशीर्वाद देऊनश्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजित पाटील यांची सत्ता आली. धराशिव, नाशिक, नांदेड, सांगोला, बीड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यामध्ये अभिजीत पाटील यशस्वी ठरल्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर कारखान्याच्या व्यवस्थापनामध्ये आमूलाग्र असे बदल झाले आहेत. मागील काही वर्षापासून ऊस गाळपामध्ये मागे असलेला विठ्ठल कारखाना आता जिल्ह्यातील स्पर्धक कारखान्यांच्या बरोबरीत आला आहे. कारखान्याच्या ४५ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच २६ दिवसामध्ये दोन लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. मागील दोन वर्षापूर्वी चुकीच्या व्यवस्थापनामुळे कारखाना बंद होता. दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीत साखर उद्योगाचा दांडगा अनुभव असलेल्या अभिजित पाटील यांच्याकडे कारखान्याची सत्ता आली. त्यानंतर श्री. पाटील यांनी बंद पडलेला हा कारखाना अल्पावधीतच सुरू केला. शिवाय शेतकरी आणि कामगारांची थकीत देणी देवून त्यांचाही विश्वास संपादन केला. गत वर्षीच्या हंगामात तब्बल सात लाख टन गाळप करून कारखान्याची गाडी रुळावर आणली. यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्याने जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे सर्वच कारखान्यांसमोर आव्हान असतानाही कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून नेटके नियोजन केले आहे. एक नोव्हेंबर रोजी कारखाना सुरू झाला. अवघ्या २६ दिवसात कारखान्याने मागील सर्व उसाचे गाळप विक्रम मोडीत काढून २ लाख टन उसाचे गाळप केले आहे. तर २ लाख ६० हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.

सरूवातीपासूनच कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्यावर लक्ष केंद्रित केल्याने दैनंदिन ७हजार

५०० टनापर्यंत गाळप करण्यात यश आले आहे. त्यामुळे अवघ्या २६ दिवसात दोन लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण करता आला. कारखान्याकडे एक हजार वाहनांची ऊस वाहतुकीची यंत्रणा आहे. दररोज आठ ते नऊ हजार टन उसाचा पुरवठा होतो. जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ८२५ इतका भाव जाहीर केला आहे. त्यानुसार पहिल्या पंधरवड्याची ऊसबिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू केले आहे. कामगार आणि संचालक मंडळाची साथ असल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्यामुळे साखर उताऱ्यातही वाढ झाली आहे. 

 अभिजीत पाटील, अध्यक्ष, श्री विठ्ठल साखर कारखाना.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement