पंढरपूर- टिम कृषीदीप न्यूज
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या सन २०२३ २०२४ गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या २,००,१११(कट्टे) साखर पोत्याचे पुजन श्री सुशिलकुमार बेल्हेकर तहसिलदार पंढरपूर, श्री संजय पाटील घाटणेकर , श्री महेश नाना साठे, श्री संभाजीराजे शिंदे, श्री शिवाजी भाऊ साळुंखे, अँड. दिनकर पाटील, अॅड. अर्जुनराव पाटील, श्री चंद्रशेखर कोंडूभैरी, श्री सचिन नकाते, प्रा.आप्पासाहेब पाटील, श्री हरीदास घाडगे, श्री तात्यासाहेब निकम, ह.भ.प.माऊली महाराज पवार यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील व सर्व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला...
सदर प्रसंगी पंढरपूरचे तहसिलदार श्री सुशिलकुमार बेल्हेकर म्हणाले की, श्री विठ्ठल कारखाना दोन वर्ष बंद असल्यामुळे ऊस तोडीबाबत शेतकरी सतत मला भेटत होते. परंतु कारखाना चालू झाल्यामुळे तालुका प्रशासनावर असलेला ताण कमी झालेला आहे. याचे सर्व श्रेय कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील व संचालक मंडळास जाते.
यावेळी संजय पाटील घाटणेकर म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील यांनी फोडली, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कारखान्यामध्ये स्पर्धा निर्माण झालेमुळे जादा दर मिळून शेतकऱ्यांना न्याय मिळाला व भविष्यातही शेतकऱ्यांना जादा दर देतील असेही ते म्हणाले.
सदर प्रसंगी बोलताना अॅड. दिनकर पाटील म्हणाले की, जिल्ह्यात कारखान्याची संख्या जादा झाल्याने कमी • दिवसामध्ये जास्त गाळप होणे आवश्यक आहे, चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील यांनी कमी दिवसामध्ये जास्त गाळप करून दाखविले. त्यामुळे सर्व शेतकयांनी आपला ऊस गळीतास देवून सहकार्य करावे.
स्वागत व प्रस्ताविक कारखान्याचे संचालक प्रा. तुकाराम मस्केसर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव श्री बब्रुवाहन रोंगे सर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, समाधान काळे, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, तानाली बागल, सचिन शिंदे-पाटील, समाधान गाजरे, धनाजी खरात, उमेश मोरे, गणेश ननवरे कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. डी.आर. गायकवाड, तसेच एम.एस.सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, कारखान्याचे माजी संचालक, पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सर्व अधिकारी य कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


0 Comments