Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांचा आदर्श इतर समाजातील कार्यकर्त्यांनी घ्यावा आ.समाधान दादा आवताडे

 

पढरपूर - टिम कृषीदीप न्यूज

आज श्री संत शिरोमणी सेना महाराज मठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आत्मविश्वासो सदैव त्यांच्या सोबत सावलीसारखे असणारे डोळ्यात तेल घालून छत्रपती शिवरायांचे रक्षण करणारे अंगरक्षक जिवबा महाले यांच्या 388 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात वरील उदगार मा. आ. समाधान आवताडे यांनी केले.

हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद यांच्या जयंती मध्ये नाभिक समाजाचे तरुण तडफदार कार्यकर्ते कै.गणेश किसन माने याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला घरचा करता पुरुष दगवल्याने त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांच्या भविष्याकरता सकल नागरिक समाजाच्या वतीने आज त्यांची मुलगी कु.अनुश्री गणेश माने तिच्या नावे रुपये 25 हजार रुपयाची एफडी करण्यात आली समाजाचे हे उपक्रम बघून मा. आ. समाधान आवताडे यांनी सुद्धा तिच्या नावे 25 हजार रुपये एफडी करण्याचे उदगार केले.

याप्रसंगी पंढरपूरची युवक नेते प्रणव परिचारक यांनी सुद्धा नाभिक समाजातील युवकांचे ह्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरवीर अंगरक्षक जिवबा महाले यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या इन्शुरन्स विषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते नाभिक समाजातील शंभर तरुण कार्यकर्ते यांचा जीवन विमा पॉलिसी उतरण्याचा संकल्प असल्याचे ही सकल नाभिक समाजाच्या वतीने सतीश चव्हाण कडून सांगण्यात आले.

नाभिक समाजातील सतीश चव्हाण महेश माने सोमनाथ खंडागळे युवराज हडपत माऊली चव्हाण हे कार्यकर्ते नेहमीच समाजात चांगल्या प्रकारची दिशा देण्यासाठी व समाजाच्या हिताच्या गोष्टी करण्यासाठी अहोरात्र झटत असताना आम्ही सदैव पाहत असतो तसाच उपक्रमात नाभिक समाजाचे ह्या युवकांनी कु. अनुश्री माने हिच्या नावे एफडी करून समाजा समोर एक आदर्श निर्माण करण्याचे काम केले आहे असे मत मा.आ.समाधान आवताडे यांनी केले

नाभिक समाज हा अतिशय गरीब समाज असून तो प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असतो परंतु या समाजाला दिशा देण्याचे आणि अनमोल सहकार्य करण्याचे मोलाचे काम गजेंद्र माने  संजय जाधव पुरुषोत्तम राऊत दिपक खंडागळे सतीश चव्हाण महेश माने सारखे कार्यकर्ते आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना मी पाहत आहे याचा मला मनस्वी आनंद होत असल्याचे प्रांजळ मत युवक नेते प्रणव परिचारक यांनी मांडले.

याप्रसंगी कार्यक्रमास नाभिक समाजातील ज्येष्ठ समाजसेवक सूर्यकांत शिंदे दिपक सुरवसे डॉ. अशोक माने संजय जाधव निलेश शिंदे किशोर भोसले पांडुरंग डांगे यांचे मार्गदर्शन लाभले

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश चव्हाण महेश माने बाळासाहेब देवकर सोमनाथ खंडागळे युवराज हडपत अनिल सप्ताळ सखाराम खंडागळे सोमनाथ चिखले परमेश्वर डांगे तेजस भोसले माऊली चव्हाण रोहित शिंदे गुलशन जाधव विठ्ठल भोसले दत्ता जाधव चंद्रकांत जाधव अविनाश शेटे सागर खंडागळे रमेश शिंदे प्रशांत शेटे सतीश भोसले विकास वाघमारे उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement