17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा सुरू आहे यामध्ये विविध शिबिरे घेऊन तपासणी केली जाते डॉक्टर व कर्मचारी जशी सेवा या शिबिरात उत्साहाने करता तशीच सेवा इतर काळातही करावी .
मंगळवेढा तालुक्यातील अरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असून कोठ्यावधी चा निधी मंजूर केला आहे अरोग्य केंद्राला लागेल ती मदत करायला तयार आहे मात्र डॉक्टरानी रुग्ण सेवेत हयगय करता कामा नये . असे आ समाधान आवताडे मंगळवेढा येथील एका कार्यक्रमात बोलत होते
तालुक्यात विशेष बाब म्हणून निंबोनी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले आहे. तसेच ग्रामीण भागात खोमनाळ, कात्राळ, ढवळस व अकोला या गावात नवीन चार आरोग्य उपकेंद्रे मंजूर केली आहेत. मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय होणार असून १०० बेडच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर होणार असून त्याबाबतचे ५० कोटीचे इस्टिमेट शासनास सादर झालेले आहे. आरोग्य विभागाच्या सुधारणेसाठी मागेल ते मिळेल फक्त सेवा चांगली द्या मंगळवेढा तालुक्यात वैद्यकिय उपचार व्यवस्थित मिळत नव्हते पण आता सामान्य असो व श्रीमंत या दवाखाण्याकडे लोकांचे पाय वळले पाहिजेत अशी सेवा करा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी डॉ वायचळ, डॉ शरद शिर्के, डॉ नंदकुमार शिंदे, डॉ मेटकरी, डॉ कारंडे, डॉ जाधव, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, भाजपा माजी अध्यक्ष दत्तात्रय जमदाडे, सुरेश जोशी,भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.सुदर्शन यादव,भाजपा मंगळवेढा शहराध्यक्ष श्री.सुशांत हजारे, आनंद मुढे, जगन्नाथ रेवे, धनंजय पाटील, खंडू खंदारे, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments