Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सरकारने आमच्या मागण्या मान्य करूनच पंढरीत यावे पंढरीतील सर्वपक्षीय शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये चेअरमन अभिजीत पाटील यांची मागणी

 

पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि विविध घटक यांच्या विविध प्रश्नाची सोडवणूक शासनाने करावी यासाठी यासाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सर्वपक्षीय आणि विविध संघटनेचे वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा तसेच सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. उजनी धरणातून भीमा नदी उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडावे. वीर धरणातून पाणी सोडून सोनके तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावा तसेच टेल टू हेड पाणी मिळावे. चारा डेपो सुरू करून जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा.दुधाला विना कपात ३८ रुपये दर द्यावा. शिक्षण व नोकरीमध्ये मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे. जालना येथील मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकावर झालेल्या लाठी चार्जची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व त्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे. 

हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय, येथे मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या भाषणात वरील मागण्या मांडत सरकारला या मागण्या मान्य करण्यासाठी सर्वांनी मिळून भाग पाडू असे सांगितले. येत्या १०तारखेला शासन आपल्या दारी येत आहे. त्यामधे जनतेची कामे मार्गी लावूनच आपल्या दारी यावे अशीही मागणी केली.

यावेळी स्वेरी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष बी.पी.रोंगेसर, काँग्रेस पक्षाचे मा.जिल्हाध्यक्ष देवानंद गुंड पाटील, पं. समितीचे माजी उपसभापती विष्णूभाऊ बागल, पांडूरंग कारखान्याचे मा.व्हा चेअरमन आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कौलगे, बिभिषन पवार, शशिकांत पाटील,  शिवसेना ठाकरे गटाचे रणजीत बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,    काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन आटकळे, राष्ट्रवादी मंगळवेढा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, मुझमिल काझी, राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष शुभांगी जाधव, राजश्री ताड, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक यांसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------

आता चेअरमन काळे यांच्या घरावरही काढावा लागेल मोर्चा

विविध प्रश्नासाठी श्री विठ्ठलचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसिलवर मोर्चा काढण्यात आला आहे.यावेळी अनेकांची भाषणे झाली. यामध्ये सहकार शिरोमणीचे माजी संचालक ॲड.दिपक पवार यांनी आपल्या भाषणात एवढ्या दिवसात बिले न दिलेल्या चेअरमन कल्याणराव काळे यांच्या घरावरही आता आपणाला लवकरच यापुढील काळात मोर्चा काढावा लागेल. असे सांगत, त्या सहकार शिरोमणी चे थकीत बिलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे

 ॲड. दिपक पवार

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement