Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांची निवड

 


सोलापूर  - टिम कृषीदीप न्यूज

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी खासदार राहूलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ति करण्यात आली.

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी, खासदार मा. राहूलजी गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणात युवकांना संधी देवून राष्ट्रकार्यात समाविष्ठ करण्याचे धोरण अवलंबले असून यानुसारच युवा आमदार प्रणिती शिंदे यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यकारणीत काम करण्याचा बहुमान मिळाला आहे.

 युवा आमदार प्रणिती शिंदे या सन 2009 पासून आमदार म्हणून कार्यरत आहेत. सलग ३ निवडणुका जिंकुन त्यांनी आपल्या विधायक कार्याचा ठसा उमटविला आहे. युवकांच्या शिक्षणापासून ते रोजगारापर्यंतच्या कामात त्या सातत्याने कार्यरत असतात. महिला आमदार म्हणून युवतींच्या, महिलांच्या समस्यांना वाचा फोडणे व शासनाकडून  त्यांचे निराकरण करण्याचे काम त्या अहोरात्र करीत आहेत.

महाराष्ट्रातील गरीब, कामगार,विडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटीत कामगार, सफाई कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेत मजूर, निराधार, दिव्यांग, अपंग, अंध, विधवा, परितक्त्या, असाध्यरोगग्रस्त, भटके विमुक्त, निराश्रीत, उपेक्षित, अन्यायग्रस्त, कुष्ठरोगी, आदिवासी या वर्गातील नागरीकांना व त्यांच्या कुटुंबायांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करून त्यांचे जिवनमान उंचाविण्याचे, त्यांच्या जिवनात सुख-समृध्दी सुरक्षितता निर्माण करण्याचे व गरीबांचे जिवन आनंदी करण्याचे महत्वपूर्ण व कसोटीचे काम आमदार प्रणिती शिंदे या करीत असून शासकीय चौकट व मर्यादा भेदून गोर-गरीबांना मदत पोहोचविण्याचे कौशल्य त्यांनी आपल्या कठोर परिश्रमातून व प्रचंड मेहनतीने साध्य केल आहे. 

कर्तत्वदक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या याच प्रामाणिक कार्याची दखल घेवून त्यांना राष्ट्रीय राजकारणात काम करण्याची व योगदान देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते सोनियाजी गांधी, खासदार राहुलजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोपविली आहे.

या सार्थ निवडीबद्दल त्यांची कर्मभुमी सोलापूर शहर, जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत व सर्वसामान्य नागरीकांमध्ये चैतन्य पसरले आहे. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या भविष्यातील उज्वल राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement