पंढरपूर - ( टिम कृषीदीप न्यूज )
सकल नाभिक समाज पंढरपूर शहर यांच्या वतीने काही दिवसापूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला श्री विठ्ठल सभा मंडप येथे श्री संत सेना महाराजांचे तैलचित्र बसवण्याची निवेदन देण्यात आले होते.
त्या निवेदनाची दखल घेत श्री विठ्ठल रुक्मिणी समिती व प्रशासनाने काल *श्री विठ्ठल सभा मंडप येथे श्री संत सेना महाराज यांचे बॅकलाईट तैलचित्र बसविण्यात आले त्या निमित्ताने आज सकल नाभिक समाजाच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी माननीय श्री राजेंद्र शेळके साहेब व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब नित्यपोचर विभाग प्रमुख श्री संजय कोकीळ यांचा सकल नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला व संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून संत सेना महाराजांच्या नावाने घोषणा देण्यात आली यावेळी पंढरपूरचे सकल नाभिक समाजाचे समाज बांधव उपस्थित होते त्यामध्ये सतीश चव्हाण पांडुरंग डांगे किशोर भाई भोसले भारत खंडागळे महेश माने सोमनाथ खंडागळे तेजस भोसले युवराज हरपत मनोज गावटे गणेश सुरवसे आदि समाज बांधव उपस्थित होते


0 Comments