Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

श्रीमती अनुराधा कदम पाटील यांची गुणवत्ता कक्षात निवड

 

फलटण - ( टिम कृषीदीप न्यूज )

फलटण तालुक्यातील मौजे गिरवी गावच्या सुकन्या व जिल्हा परिषद केंद्र शाळा फरांदवाडी येथील उपक्रमशील व प्रयोगशील उपशिक्षिका श्रीमती अनुराधा कदम पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे शिक्षणव्यवस्था परिवर्तन घडवून आणण्यासाठी खूप मोलाची मदत झाली आहे.विशेषत: इंग्रजी भाषा शिकण्यासाठी विविध अध्यापन पद्धती, कृतीतून, आनंददायी पध्दतीने शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत.याची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती फलटण यांनी अनुराधा कदम पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील शैक्षणिक उपक्रम, प्रयोग, प्रकल्प, गुणवत्ता विकासासाठी राबविण्यात आलेल्या शैक्षणिक पध्दती याची माहिती तालुक्यातील गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील सर्वांना व्हावी म्हणून श्रीमती अनुराधा कदम पाटील यांची फलटण तालुका गुणवत्ता कक्षात तज्ञ मार्गदर्शक शिक्षक म्हणून निवड केली आहे.

याबद्दल श्रीमती अनुराधा कदम पाटील यांचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती शाहीन पठाण, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल संपकाळ, केंद्रप्रमुख अनिल कदम, मुख्याध्यापक शिवाजी माने, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विविध शिक्षक संघटना अध्यक्ष यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement