Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भंडीशेगांव येथे आरोग्य जनजागृती शिबीर संपन्न

 


पंढरपूर - ( टिम कृषीदीप न्यूज )

भंडीशेगांव (ता.पंढरपूर)येथे ग्रामपंचायत व पावले हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य जनजागृती शिबीर संपन्न झाले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील उद्योजक अजित कंडरे हे उपस्थित होते,

आरोग्यासाठी सर्वांनी नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे असून आहार योग्य घ्यावा तसेच वेळच्या वेळी वयस्कर व्यक्तींनी आपली नियमित रक्ताच्या तपासण्या करून घ्याव्यात,कोरोनानंतर वाढलेले आजार,मधुमेह, रक्तदाब,या आजारावर नियमित औषधे घेण्यासाठी डॉक्टर ची मदत घ्यावी,तशेच निरोगी जीवन जगणाच्या बऱ्याच गोष्टी यावेळी डॉ.अमित पावले यांनी सांगीतल्या.

ग्रामीण भागात आरोग्य विषयक माहिती आणि औषध उपचार याची माहिती व्हावी लोकांना प्राथमिक उपचारासाठी स्थानिक पातळीवर कोणती काळजी घ्यावी या सर्व गोष्टीची गरज आसलेची माहिती भाजपा वैद्यकीय सेल चे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार यांनी दिली.

आरोग्य जनजागृती शिबिराच्या शेवटी शंभराहून जास्त रुग्णाचे रक्तदाब, साखरेचे प्रमाण चाचणी,तसेच इ-सी-जी मोफत करण्यात आले.

कार्यक्रमास सरपंच मनीषा येलमार,डॉ.बजरंग सुरवसे,डॉ.मेलगे,श्री.पांडुरंग साखर कारखाना चे संचालक गंगाराम विभूते,डॉ.हेडगेवार वाचनालय चे महेंद्र येलपले,मारुती गिड्डे,भैरवनाथ मंदिर समितीचे उपाध्यक्ष संतोष येलमार,माजी उपसभापती शिवाजी कोळवले,हनुमंत सुरवसे,मधुकर गिड्डे,संजय रणखांबे,रमेश शेगावकर, सतीश रणखांबे,बाबुराव पावले,आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन माजी उपसरपंच संतोष ननवरे यांनी केले तर आभार विजय पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement