माळशिरस - प्रतिनिधी
पोलीस मित्र संघटणेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख मा भगत सर सोलापूर जिल्हा दौरावर आले असताना सोलापूर जिल्हा कमिटी आणि माळशिरस तालुका कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले. शासकीय विश्रामगृह माळशिरस येथे पोलीस मित्र संघटणे च्या माळशिरस तालुका कमिटीच्या सदस्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या . सदस्स निवडी नंतर मा भगतसर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भगत सर यांनी मार्गदर्शन करताना पोलीस मित्र संघटनेचे ध्येय उद्दिष्टे आणि नियमावली आणि संघटनेचे काम तळागाळापर्यंत, सामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचेल याचे विषयी सर्व पदाधिकारी यांना माहिती देण्यात आली. पोलीस मित्र संघटना सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात, ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवून सदस्य नोंदणी अभियान करण्याच्या सुचना देण्यात आल्या सदस्य नोंदणी अभियान जिल्हा पातळी व तालुका पातळीवर आयोजित करून जास्तीत जास्त सदस्य जोडण्याचे काम करावे असेही सुचित करण्यात आले
यावेळी माळशिरस तालुका कमिटी च्या निवडी जाहीर करण्यात आल्या
माळशिरस तालुका अध्यक्ष देविदास नारायण वाघमोडे (पाटील)
सचिव उमेश हनुमंत चव्हाण
माळशिरस तालुका युवा अध्यक्ष रामदास नाना कोकरे
यावेळी कपिल वाघमोडे आप्पासाहेब वाघमोडे आप्पा साहेब भामरे रावसाहेब गोरड लक्ष्मण वाघमोडे नवनाथ वाघमोडे देवा वाघमोडे पाटील यांची सदस्यपदी निवड करण्यात आली
यावेळी जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments