सातारा दि.(प्रतिनिधी मोहन जगताप )
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्याला साहितिकांसह नाटय. कला, क्रीडा, शैक्षणिक, राजकीय, सामजिक व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी साताऱ्यासह महाराष्ट्राच्या जडघडणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. अशाच सातारा जिल्ह्यातील नुने गावचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री. प्रमोद नाथाजी कुर्लेकर
यांनी हिंदू मुस्लिम एक्यावर चित्रीत केलेल्या 'His Nurturer' या चित्राला, 11 ते 14 मे 2023 दरम्यान अमेरिकेत संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकला संमेलना मधे उत्कृष्ट चित्राचा 'असाधारण गुणवत्ता' पुरस्कार प्राप्त झाला आहे. जगभरातील साडेतीन ते चार हजार स्पर्धकां मधून हा पुरस्कार तब्बल 6 वेळा पटकावणारे कुर्लेकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील एकमेव चित्रकार ठरलेले आहेत. ते हा पुरस्कार स्वीकारण्याकरता तसेच चित्रकलेशी निगडित इतर विविध उपक्रमांन मधे सहभागी होण्या करता दोन महिन्यांच्या प्रदीर्घ अमेरिका दौऱ्यावर होते, ते नुकतेच भारतात परतले आहेत.
प्रमोद कुर्लेकर हे सातारा जिल्ह्यातील नुने गावचे नागरिक असून त्यांनी सांगली आणि मुंबई येथे अनुक्रमे कलाविश्व महाविद्यालय आणि सर जेजे स्कुल ऑफ आर्ट या नामांकित महाविद्यालयान मधुन कलेचे उच्च शिक्षण प्राप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कारान बरोबरच त्यांना कलाक्षेत्रातील राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जवळजवळ सर्व प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. देश विदेशातील जहांगीर आर्ट गॅलरी सारख्या अनेक प्रतिष्टीत कालादालनांन मध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शने संपन्न झाली आहेत.
आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत त्यांनी देशातील कित्येक नामवंताची चित्र चितारली आहे त्यामधे प्रामुख्याने गानसम्राज्ञी आशा भोसले, अनाथांची माई शिंधुताई सपकाळ, मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी व जावई आनंत पिरामल त्याच बरोबर जिंदाल अर्थात जे. एस. डब्लू. समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सज्जन जिंदाल इत्यादींचा सामावेश आहे.
व्यावसायिक चित्रां बरोबरच कुर्लेकरांची 'रेड बुद्धा' ही चित्र मालिका विशेष प्रसिद्ध आहे. त्यांची चितारलेली काही सामाजिक विषयावर आधारित प्रबोधनात्मक चित्र खूप नावाजली गेली आहेत. चित्रकलेच्या माध्यमातून ते समाजसेवत देखील सक्रिय असतात. कोरोना काळातील टाळाबंदीच्या दरम्यान त्यांनी 'आर्ट फॉर सोसायटी' या उपक्रमाच्या माध्यमातून दोन महिन्यात 70 हुन अधिक चारकोल मधील व्यक्तिचित्र चित्रित करून एकहाती तब्बल 4 लाखाचा निधी उभा करून केंद्र आणि राज्य सरकारच्या राहत कोशात जमा केला.
कोल्हापूर तसेच सांगली मधील पूरग्रस्थ विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आपल्या चित्रकार सहकाऱ्यांन सोबत 'वाटा खारीचा' या उपक्रमाअंतर्गत चित्र प्रदर्शन तसेच प्रत्यक्ष व्यक्तिचित्रनाच्या माध्यमातून भरगोस निधी उपलब्ध करून शालेय साहित्त्याच्या माध्यमातून अनेक शाळांमध्ये वितरित केला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करून कलेचा उत्कर्ष साधण्या बरोबरच कलेच्या माध्यमातून सामाजिक दायित्व जपणाऱ्या प्रमोद कुर्लेकर यांचे हार्दिक अभिनंदन !!!




0 Comments