पंढरपूर: ( टिम कृषीदीप न्यूज )
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल सह. साखर कारखाना लि., वेणूनगर येथे दिनांक ५ जून २०२३ रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करणेत आला. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कारखाना परिसरामध्ये कारखान्याचे संचालक श्री कालिदास साळुंखे व प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांचे शुभहस्ते वृक्षारोपन करण्यात आले. तसेच सर्व कारखाना परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविणेत आले व पर्यावरणाचे महत्व पटवून देणेसाठी कारखाना
आवारामध्ये व कामगार वसाहतीमध्ये डिजीटल बोर्ड लावणेत आले. या प्रसंगी कारखान्याचे वर्क्स मैनेजर श्री यु.के. तावरे, चिफ केमिस्ट श्री बी. आर. माने, डिस्टीलरी मैनेजर श्री एन. एस. सोळंके, पर्यावरण केमिस्ट श्री एस.बी. गायकवाड, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments