Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

परिस्थितीला हरविणार्‍या लेकरांचा अभिमान

 


 परिस्थितिशी झगडून मुलाला डॉक्टर  बनविणार्‍या आईची कहाणी 

पंढरपूर - (टिम कृषीदीप न्यूज )

 परिस्थितीला  दोष देत जिंकण्याच्या स्पर्धेतून माघार घेणारी माणसं आज पावलोपावली भेटतात. पण परिस्थितीशी  झगडणार्‍या कुटुंबाला यशाचा पांडुरंग कधी ना कधी पावतोच याची प्रचितीच आमच्या लेकराने आमच्या पदरात टाकली आहे.  उदनिर्वाहापासुन ते लेकरांच्या शिक्षणापर्यंत अनेक कठीण परीक्षा या परिस्थितीने  घेतल्या. पण आम्ही कधी हात टेकले नाहित. उलट परस्थितीलाच   नमतं घ्यावं लागलं. ज्ञानेश्वरच्या  जिद्दीपुढे  परस्थितीतच हतबल बनून राहिली आहे. ज्ञानेश्वरच्या  डॉक्टर  होण्यानं परिस्थिती  हारली आणि आमची लेकरं जिंकली. याचा आम्हाला आणि आमच्या गावकर्‍यांना खुपच अभिमान आहे. असेच उदगार  डॉ . ज्ञानेश्वरची  आई  सुनिता गायकवाड यांनी काढले.  

पंढरपूर तालुक्यातील  रोपळै येथील ज्ञानेश्वर रमेश गायकवाड या तरूणाने परिस्थितीशी  झगडा देत डॉक्टर  या पदाला गवसणी घातली. याबाबत त्याची आई सुनिता रमेश गायवाकड या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या कि, परिस्थिती  गरीब असल्याने मुलांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी आल्या. पण त्या परिस्थितीलाही  तोंड देत ज्ञानेश्वर शिकत आहे. कारण त्याला आई वडीलांच्या कष्टाची जाणीव होती.

पुढं खर्च मोठय़ा प्रमाणात वाढल्याने स्वतः हुशार असतानाहि मोठय़ा मुलगा विकासने शिक्षण थांबवून ज्ञानेश्वरला  शिक्षणासाठी प्रेरणा दिली. वेळोवेळी नातेवाईकांसह अनेकांनी मदत केली. मार्गदर्शन केलं. त्यामुळेच आजचा हा आनंदाचा क्षण पहावयास मिळत आहे. गरीब परिस्थितीला  तोंड देत असताना त्याचा कधीहि बाऊ न करता जिद्दीने डॉक्टर  झालेला ज्ञानेश्वर आणि भावासाठी आपल्या शिक्षणाचा त्याग देणारा विकास अशा लेकरांचा अभिमान वाटवा तेवढा थोडाच आहे. तर ज्यांनी मार्गदर्शन केले, सहकार्य केले अशा नातेवाईकांचे ऋण शब्दाने तर फिटणारच नाहित. असे ज्ञानेश्वरच्या  आई सुनिता गायकवाड यांनी भावुक होवून सांगितले. यावेळी डॉ . ज्ञानेश्वरचे वडील रमेश गायकवाड यांनीहि मुलांचे यशाबाबत कौतुक केले.

डॉ . ज्ञानेश्वर गायकवाड यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रोपळे येथेच झाले. त्यानंतर त्याने आर.ए.पोतदार मेडीकल कॉलेज पुणे तेथे  बीएएमएस केले आहे. तर सध्या तो सीएआरसी मेडीकल कॉलेज पुणे येथे एमडीचे शिक्षण घेत आहेत. डॉ . ज्ञानेश्वर यांचे हे यश परिस्थितीशी  झगडून यशस्वी होण्याचे स्वप्न बाळगणार्‍या अनेक तरूणांसाठी यातून  प्रेरणाच मिळणार आहे.


त्यागी भावंड आणि मदतगार गावकरी....

आजच्या जमान्यात भावंडांमध्ये अनेक कारणांवरून कलह पहावयास मिळतो. परंतु डॉ. ज्ञानेश्वरचे  कुटूंब त्याला अपवाद ठरले असून ज्ञानेश्वरच्या  शिक्षणसाठी मोठा भाऊ विकासने आपल्या शिक्षणाचा त्याग केला अशी त्यागी भावंड आज अपवादानेच पहावयास मिळतात. तर  नातेवाईक व ग्रामस्थांनी  त्याला मदत करून एक सामाजिक संदेशच दिला आहे. यामुळे मदत करणारे नातेवाईक, त्यागी भावंडे यांचे कौतुक होत आहे.


 ज्ञानेश्वरच्या डॉक्टरकीचा  अवघ्या वस्तीला आनंद....

आपल्यात सहजतेने वावरणारा   ज्ञानेश्वर आज डॉ. ज्ञानेश्वर झाला आहे. याचं आप्रुप रोपळ्यातील   अवघ्या अंबीकानगरला झाले असून त्याच्या या यशाबद्दल वस्तीवरच्या जय भवानी तरूण मंडळाच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक दिनकर कदम, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, ग्रा.प.सदस्य अनिल कदम, नितीन कदम, शुभम भोसले, जनहितचे  औदुंबर गायकवाड यांच्यासह गावातील व वस्तीवरील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी डॉ . ज्ञानेश्वरच्या  यशाचे आणि आई वडीलाच्या कष्टाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement