सातारा-- (टिम कृषीदीप न्यूज )
सातारा जिल्ह्यातील विशेषता सातारा जावली या डोंगरी तालुक्यातील लोक आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून मुंबई पुण्यात व ठाणे या ठिकाणी व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने आपल्या मायभूमि पासून कोसो मेल दूर जावून कुटुंब तबेला आज ही सुरक्षितपणे सांभाळण्याची जबाबदारी पार पाडून आपल्या मुलांना सुट्टीच्या दिवसात गावची ओढ लागणारी अनेक कुटुंबवस्तल असणार्या काकां मावशी कडे मुलांना ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे धडे देण्यासाठी मुंबई स्थित पालक मुलांना आपल्या संस्कृतीच्या नावाखाली ग्रामीण जीवन जगण्यासाठी पाठवितात अशाच एका कुटुंब वस्तल चित्रकार व पत्रकार असणार्या जावली तालुक्यातील भणंग येथील माजी जिल्हा परिषद सदस्य कविता मोहन जगताप यांची बहीण नंदा जावळीच्या दुर्गम अशा डोंगर दऱ्यातील कावडी गावत रहिवास म्हणून राहणारे हे कुटुंब व्यवसायाने ठाणेस्थित आहेत. काका मावशीकडे जाण्याने त्याची ग्रामीण संस्कृतीशी अजूनही नाळ घट्ट असून त्यांच्या कन्या असणार्या जान्हवी मानकुमरे सुट्टीच्या कालावधीत सातार्यातील ग्रामीण संस्कृतीशी नाते घट्ट असून गतवर्षी कास पठाराच्या वन्य जीव व पुष्प परिसरातील पाहणीनुसार तेथील चित्ररथ दिल्लीत 26 जानेवारीला सादरीकरण झाले त्याच परिसरातील काकांच्या जगताप रेस्टॉरंट येथील विलोभनीय अशा परिसराचे दिल्लीत संचलन होते हाच ध्यास घेवून जान्हवी हिने आपल्या कलागुणांचे नृत्य प्रदर्शन सुरू करून महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक व कला संचालनालय यांच्या पर्यंत मजल दरमजल करीत तिची कला सादर केली. मुळात कलावंत म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या जान्हवी चे काका मोहन जगताप यांचे तिला सातत्याने मार्गदर्शन लाभले. या वर्षी होणार्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात महाराष्ट्रातून सादर होणार्या चित्ररथावरील नारी शक्ति साडेतीन विद्यापीठ या विषयावरील चित्ररथा नृत्यासाठी तिची सांस्कृतिक कार्य संचालन विभागाने मुंबई ठाणे येथून निवड केली आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व जावली बैंक संचालक जयश्री मानकुमरे यांची ती पुतणी असून तिच्या या निवडीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर ,ठाणे महानगरपालिका स्थाई समिति अध्यक्ष संजय भोईर, रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवरांनी या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.......

0 Comments