फलटण - ( टिम कृषीदीप न्यूज )
राष्ट्रीय मतदार दिन -२०२३ निमित्ताने मतदार नोंदणी, वगळणी, दुरुस्ती यासंबंधी पर्यवेक्षक म्हणून केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल "आदर्श पर्यवेक्षक पुरस्कार" भारतीय निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमात मतदार नोंदणी अधिकारी शिवाजीराव जगताप (प्रांत साहेब तथा उपविभागीय अधिकारी, फलटण ) व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी समीर यादव (तहसीलदार साहेब, फलटण) यांचे शुभहस्ते फलटण येथील दरबार हॉलमध्ये फलटण तालुक्यातील उपक्रमशील प्रयोगशील अभ्यासू शिक्षणतज्ञ अनिल बुवासाहेब कदम केंद्रप्रमुख गिरवी व आरडगांव फरांदवाडी (अतिरिक्त कार्यभार)ता फलटण यांचा प्रमाणपत्र सन्मानपत्र गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार संपन्न झाला.
याबद्दल अनिल बुवासाहेब कदम यांचे शिवराज कदम, संचालक श्रीराम सहकारी साखर कारखाना,फलटण, रामभाऊ कदम, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण, भगवंतराव कदम अध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती, संतोष कदम अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ, निलेश जाधव, अध्यक्ष,जुनी पेन्शन हक्क संघटना संजय कचरे, अध्यक्ष,दिव्यांग शिक्षक संघटना अधिकारी, पदाधिकारी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

0 Comments