वादग्रस्त विधाने करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा ; पंढरपुरात तीव्र निषेध
पंढरपूर-
शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणाऱ्या महापुरुषांबद्दल चुकीच्या पद्धतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेच्या मनाला ठेच लागली असून आधीच राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना त्यात आणखी भर घालण्याचे काम मंत्री पाटील यांनी केले असून वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून महाराष्ट्रातील शांतता बिघडवणाऱ्या नेत्यांना जनतेने कायमचा धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे. महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पंढरपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ,राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेल ,राष्ट्रवादी ओबीसी सेल ,राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल यांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी एक दोन तीन चार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार, महात्मा फुले यांचा जयजयकार, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जयजयकार या घोषणेने परिसर दणाणून गेला. या आंदोलनानंतर महापुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

0 Comments