पंढरपूर– (टिम कृषीदीप न्यूज )
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे बार्शी मधील माईर्स एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च कॉलेजमध्ये आयोजित विद्यापीठ स्तरीय ‘अविष्कार-२०२२’ या संशोधन स्पर्धेत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व कॉलेज ऑफ फार्मसी मधील एकूण चार विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वेरीतील संशोधन परंपरेसाठी ही महत्वाची बाब ठरली आहे. यामुळे पंढरपूर पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे प्रत्येक वर्षी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांसाठी ‘अविष्कार संशोधन महोत्सव’ हा स्पर्धात्मक संशोधन उपक्रम राबविला जातो. यंदा हा महोत्सव बार्शी (जि.सोलापूर) मधील माईर्स एमआयटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यात स्वेरी संचलित कॉलेज ऑफ फार्मसी मधील सोनम महादेव जाधव यांनी पदवी विभागातून ‘अॅग्रीकल्चर, अनिमल अँड हजबंडरी’ विषयात द्वितीय क्रमांक, स्वाती तानाजी अलदर यांनी पदवी विभागात ‘मेडिसिन अँड फार्मसी’ मध्ये दुसरा क्रमांक तर सिद्दिका अल्ताफ इनामदार यांनी पदव्युत्तर विभागात ‘मेडिसिन अँड फार्मसी’ विभागात तिसरा क्रमांक पटकाविला तर इंजिनिअरींग विभागातून सौरभ धनाजी घाडगे यांनी पदवी विभागातुन प्युअर सायन्स विषयातील संशोधन सादर करून तिसरा क्रमांक पटकाविला. स्वेरीच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते पुरुस्कार देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत स्वेरीकडे चार पुरस्कार आल्यामुळे स्वेरीतील संशोधन विभागाला भविष्यात अधिक गती येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन क्षमता वाढीस लागणार, हे निश्चित. संशोधनातील या गुणवंतांना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, स्वेरीच्या अविष्कारच्या समन्वयक डॉ.विद्याराणी क्षीरसागर, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डॉ. वृणाल मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. ‘अविष्कार २०२२’ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

0 Comments