पंढरपूर (दि.27):- कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी सांप्रदाच्या प्रथा परंपरेप्रमाणे चंद्रभागा वाळवंटात भजन व किर्तन करण्यासाठी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शुध्द नवमी ते शुध्द पोर्णिमेपर्यंत तंबू / मंडपासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने चंद्रभागा नदीपात्रातील वाळवंट भजन, किर्तनासाठी रिकामे राहील याची दक्षता घेवून पाणी सोडण्याबातचे नियोजन पाटबंधारे विभागाने करावे.तसेच चंद्रभागा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भाविक स्नानासाठी जातात तेथे पाणीपातळी बाबतचे सूचना फलक लावावेत अशा सूचना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिल्या.
कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयी-सुविधासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हा अधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव, राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक नितीन धार्मिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, भीमा पाटबंधारे विभागाचे महेश चौगुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0 Comments