*
प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदें सह काँग्रेस नेत्यांची अकोला जिल्ह्यातील पदयात्रा मार्गाची पाहणी
पंढरपूर- (टीम कृषीदीप न्यूज)
भारत जोडो" यात्रेचा संदेश घेवून कन्याकुमारी ते कश्मीर ३७५० की मी ची पदयात्रा घेवून मा श्री राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "भारत जोड़ो" पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात येत असुन महाराष्ट्रात "भारत जोड़ो" पदयात्रेचा ७ ते २० नोव्हेम्बर २०२२ या कालावधीत ३८२ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. नांदेड़, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव मधील जामोद मार्गे मध्यप्रदेश ला ही पदयात्रा रवाना होणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीने अकोला जिल्ह्यातील "भारत जोड़ो" पदयात्रेची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर सोपविली आहे.
महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला यात्रेचे आगमन होत आहे. तेलंगणातून नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश होईल. "भारत जोडो" यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात १४ दिवसांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते.
ही पदयात्रा यशस्वी "भारत जोडो" चे नियोजन प्रमुख बैजू सर, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह अकोला ग्रामीण व शहर काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत भारत जोड़ो पदयात्रा पुर्वतयारी बैठक घेण्यात आली. अकोला जिल्ह्यातून जाणाऱ्या पदयात्रेच्या मार्गाची पाहणी केली. राहुल गांधी यांचा अकोला सह राज्यातील "भारत जोड़ो" पदयात्रा यशस्वी करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.
0 Comments