Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

अभिजीत पाटील यांचा माढा मतदार संघात महिलांनी सुरू केला प्रचार

 


महिलांचा गृहभेटीवर भर तर श्री.पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे गावभेट दौरे सुरू

पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज

माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारात आता महिलांनी प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. स्वतः पाटील यांची एक टीम, शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांची एक टीम तर आनंद पाटील, अमर पाटील यांची टीम आणि महिला वर्गाची एक टीम करून मतदार संघातील वेगवेगळ्या भागातील गावभेट दौऱ्यातून तीनही टीम विकासकामांसाठी मते मागताना दिसत आहेत.  श्री.पाटील यांनी काल माढा तालुक्यातील बावी, भुताष्ठे, विठ्ठलवाडी, लोंढेवाडी, चिंचोली, खैरेवाडी, महातपूर, राहुल नगर, निमगाव या गावांचा प्रचार दौरा केला. या सर्वच ठिकाणी त्यांना स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सायंकाळी वडशिंगे व दारफळ येथे जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी मागील तीस वर्षांपासून आमदारकी हातात असतानाही माढा विधानसभा मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांचीही पूर्तता झालेली नाही असे सांगून विकासकामांसाठी निवडून देण्याचे आवाहन केले. याशिवाय साखर कारखानदारीचे राजकारण वेगळे आणि विधानसभेचे वेगळे असे सांगून त्यांनी विकासकामांचे विषय घेऊन निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे असे ते म्हणाले. 

दुसरीकडे सुमित्रा अभिजीत पाटील व रश्मी अमर पाटील यांनी गावोगावी महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन देगाव, अजनसोंड, शेगाव, उंबरे, कान्हापुरी, देवडे, जळोली, खेडभोसे, उपळाई, माढा शहर, यांसह अनेक गावांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला.  त्यांचेही महिला वर्गातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. मुलींच्या आणि युवकांच्या उच्च शिक्षणाची सोय, महिलांच्या आरोग्यासाठी दवाखान्यांची सोय, रस्ते, बसस्थानक, यासाठी अभिजित पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन महिलांना केले जात आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement