Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रीय स्वराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरी बागल यांची भेट

 

मुबई - टिम कृषीदीप न्यूज  

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे  दहिसर मुंबई येथे आले . यावेळी NDA भाजपा चे मित्र पक्ष असलेले राष्ट्रीय स्वराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरी बागल यांची भेट घेतली. यावेळी  अँड श्रीहरि बागल म्हणाले    लोकसभेच्या ४८ जागा जिंकु आणी पुन्हा नरेंद्र मोदी याना पंतप्रधानपदी विराजमान करून इतिहास रचुया.

        विरोधकाना क्लीन बोल्ड करून लोकसभेच्या १०० % जागा निवडून आणण्याचा विश्वास त्यांनी दाखवून दिला व याच विजयाची पुनरावृत्ती हि  मा.चंद्रशेखर बावनकुळे, आमदार  प्रवीण दरेकर,  आमदार प्रसाद लाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनात याची पुनरावृती हि विधानसभा - २०२४ ला हि  होणार असे सागुन राष्ट्रीय स्वराज्य सेना या राजकीय पक्षाने  कामाला सुरवात ही केली  आहे असे या विशेष भेटीत सांगीतले . 

दरम्यान या झालेल्या भेटी वेळी उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस  यांनी समाधान व्यक्त करून हस्तांदोलन करत् या कामाला शुभेच्छा दिल्या.

या  आनंदाच्या क्षणी राष्ट्रीय स्वराज्य सेना ( राजकिय पक्ष) चे कोल्हापूर जिल्ह्या अध्यक्ष - पोपट फुकटे , सोलापुर जिल्ह्य अध्यक्ष-अॅड सुग्रीव बागल , जालना जिल्ह्या सचिव सुनील सोनार व मुबई अध्यक्ष व महाराष्ट्र अध्यक्ष व ईतर प्रमुख पदाधिकारी  हि  उपस्थित होते .



Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement