Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

इंदूरमध्ये महाराष्ट्रातील 17 जणांना नवकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

 


जैन समाजाचा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मंच नवकार अभियोग्यता अलंकरण सीझन 4 पुढील महिन्यात इंदूरमध्ये आयोजित केला जाणार

पुणे : ( टिम कृषीदीप न्यूज )
जैन समाजाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार मंच नवकार महोत्सव अंतर्गत अहिंसा प्रचारक आणि राजकारणी यांच्यासह समाजसेवी, सामाजिक संस्था, अहिंसेच्या मार्गावर काम करणाऱ्या गुरुभगवंतांचा देशाबरोबरच जागतिक स्तरावरही नवकार महामंत्र टाईम्स द्वारा गौरव केला जाणार आहे . नवकार महामंत्र टाईम्स जैन समाजाचे आंतरराष्ट्रीय माध्यम असून नवकार या उपाधीने अलंकृत केले गेले आहे. आणि ही प्रथा पुढे नेत, शीर्षक पुरस्कार समितीने नवकार महोत्सव 2022 अंतर्गत जैन समाजाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार मंचाचे आयोजन केले आहे.

नवकार उपाधि अलंकरण - सीजन 4 मध्ये विविध पुरस्कारांनी सन्मानीत होणार्या 129 सन्मानियांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई,पुणे सहित सोलापुर व कोल्हापुर चे पद्मश्री,पत्रकार,मंत्री, समाजसेवी,विधायक,बॉलीवुड गायक व संगीतकार आदि यात आहेत.

महाराष्ट्रातील या 17 सन्मानियांना नवकार पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

नवकार महारत्न पुरस्कार - पद्मश्री डॉ.विजय शहा सांगली महाराष्ट्र ,माननीय राष्ट्रपतींचे माजी मुख्य दन्त चिकित्सक म्हणून 40 वर्षांहून अधिक वर्षे सेवारत राहिलेले तसेच विविध अंतराष्ट्रीय स्तरावरील अनेक संघटनांवर विविध पदांवर कार्यरत,
नवकार रत्न - श्री मंगल प्रभात जी लोढा, (मंत्री महाराष्ट्र शासन) मुम्बई,
धनासा सेठ श्री धन जी गाला, मुम्बई,
रतन मोहन शर्मा (शास्त्रीय गायक कलाकार) जैन भक्ताम्बर गायन विशेषज्ञ, मुम्बई,

नवकार विभुषण - सुश्री पलक मुछाल, (पार्श्व गायिका) मुम्बई,
डॉ.राजेश फडे पत्रकार समाजसेवक, पंढरपुर, श्री अतुल भाई शाह, चन्दुकाका सर्राफ ॲण्ड संस बारामती पुणे,
श्री अशोक मूणोत समाजसेवक पूणे,
श्री शैलेन्द्र जी घीया समाजसेवक, मुम्बई,

नवकार गौरव -

डॉ. रेणूका जी देसाई, मुम्बई,
श्री प्रकाश जी अवाडे, आमदार, इचलकरंजी,
श्री चन्द्रकान्त जी पाटील सत्यवादी समाचार कोल्हापुर,
श्री भूषण जी गोगड म्यूजिक डायरेक्टर मुम्बई, श्री प्रणब कुमार बिश्वास शास्त्रीय एवं पार्श्व गायक कलाकार बॉलिवुड ,आंतराष्ट्रीय स्तरावरील अहिंसा धर्म प्रचारक,

नवकार सेवा रत्न -
श्रीमती गीता जी जैन - आमदार मीरा भाईंदर,

नवकार जीवदया रत्न -
श्री ललित जी शक्ति, मुम्बई,
श्री डॉ. विनोद जी कोठारी, मुम्बई

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement