Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

समृद्धी ट्रॅक्टर येथे लकी ड्रॉ मोठ्या उत्साहात संपन्न

 







पंढरपूर-  ( टिम कृषीदीप न्यूज )

पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील आघाडीचे ट्रॅक्टर विक्री शोरुम समृध्दी ट्रॅक्टर्स आपल्या अभिनव उपक्रमांमुळे सातत्याने चर्चेत असते. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने समृध्दी ट्रॅक्टर्सकडून 'सोनालीका ट्रॅक्टर खरेदी करा आणि सोने जिंका' ही लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात चिठ्ठ्या टाकून विजेते स्पर्धक निवडले जातील असे ठरविण्यात आले होते. विजेत्या शेतकऱ्यांना ५ ग्रॅम, ३ ग्रॅम, २ ग्रॅम असे सोने बक्षीस म्हणून देण्यात येईल असे घोषित करण्यात आले होते. 


आपल्या कृषीप्रधान देशात जय जवान जय किसान असा नारा देत श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष श्री अभिजीत आबा पाटील यांनी शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर खरेदीवर सोने जिंकण्याची संधी समृध्दी ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे. 


या लकी ड्रॉचा निकाल जाहीर झाला असून सांगोला तालुक्यातील हंगिर्गे गावातील विकास सदाशिव सावंत यांनी ५ ग्रॅम, सांगोला तालुक्यातील सावे येथील  शिवाजी अशोक कुंभार यांनी ३ ग्रॅम, तर बीड येथील चोसला गावातील अण्णासाहेब दिनकर नायगुडे यांनी २ ग्रॅम सोने जिंकले आहे. सर्व विजेत्या शेतकऱ्यांचे समृध्दी ट्रॅक्टर्सच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. 


आता पुन्हा एकदा समृध्दी ट्रॅक्टर्सच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ट्रॅक्टर खरेदीसाठी १ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत समृध्दी ट्रॅक्टर्स येथे ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना सोने जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन समृध्दी ट्रॅक्टर्सकडून करण्यात आले आहे.


यावेळी कार्यक्रमासाठी संचालक अभिजीत कदम, अच्युत मलपे, पोरेदादा, मॅनेजर सोमनाथ केसकर, सर्व शेतकरी बांधव आणि कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement