पंढरपूर  - ( टिम कृषीदीप न्यूज )

माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, वाखरी (ता. पंढरपूर) येथील माध्यमिक आश्रमशाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेमध्ये प्रशालेचा एकूण निकाल ७७.०८% लागला असून, विद्यार्थिनींनी गुणवत्तेत बाजी मारली आहे. सई नवनाथ पोरे हिने ९३.२० टक्के गुणांसह प्रशालेत आणि केंद्रात ही प्रथम क्रमांक मिळवला आहे.

प्रशालेतून १० वीच्या परीक्षेसाठी एकूण ९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी निकालामुळे परिसरातून शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

गुणवत्ता यादीमध्ये मुलींनी वर्चस्व गाजवले असून  कु. सई नवनाथ पोरे  ९३.२०% गुणांसह प्रथम कु. शितल औदुंबर लंगोटे ८६.४०% गुणांसह द्वितीय तर कु. संजीवनी भाऊसाहेब पोरे हिने ८५.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शाळेचा विषयनिहाय निकाल समाधानकारक लागला असून 

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.मंदार सोनवणे, सचिव डॉ मदन क्षीरसागर, खजिनदार डॉ.सौरभ सोनवणे, उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, सर्व संचालक, मुख्याध्यापक मोहन क्षीरसागर आणि शिक्षक वृंदाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.