पंढरपूर. ( टिम कृषीदीप न्यूज)

 जैनवाडी, ता पंढरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.गणेश जमदाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शोभाताई गोफणे ह्या होत्या.

        गुढीपाडवा पट वाढवा या अभियानांतर्गत पुढील शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेचा माजी विद्यार्थी स्वस्तिक सागर खाणे हा नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत पात्र झाल्याबद्दल त्याचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक महादेव जमदाडे यांनी 

' गुढीपाडवा पट वाढवा ' या उपक्रमाचा उद्देश सांगितला. तसेच शाळेच्या सर्वांगिण विकासात पालकांची भूमिका महत्वाची असते असे सांगून शाळेच्या गुणात्मक विकासाचा आढावा सांगितला.

        प्रा. गणेश जमदाडे म्हणाले की, 

शालेय वयात विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण दिले गेले तर त्याचा पाया मजबूत होतो व मुलाच्या सर्वांगीण विकासात शाळा महत्त्वाची भूमिका पार पाडते. आपल्या मराठी शाळेतूनच शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी एमपीएससी सारख्या अवघड असणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळवून विविध प्रशासकीय पदावर सेवा बजावीत आहेत. या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. शाळेच्या भौतिक व गुणात्मक विकासाबद्दल समाधान व्यक्त केले.

       कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. तालुकाध्यक्ष दीपक पवार यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सरपंच शोभाताई गोफणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा.गणेश जमदाडे, मा. उपसरपंच जालिंदर गोफणे, सुभाष पवार, सुहास गोफणे, बिभीषण पवार, अमोल शिंगटे, धनंजय बलदोडे, मुख्याध्यापक महादेव जमदाडे, दीपक कांबळे, सचिन शिंदे, उषा मुंडे, विजय पिसे, अंगणवाडी सेविका सविता कंबीरे, सुलभा लोखंडे, रितु सुतार, लक्ष्मी शिंगटे, लता माने व बहुसंख्य पालक उपस्थित होते.