मुंबई - विशेष प्रतिनिधी
एक मराठा कोटी कोटी मराठा... संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्या गरजवंत मराठ्यांचा लढा ,मुंबई वारी, मराठा आरक्षणास राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष) निवडणूक चिन्ह बासरी यांचे अध्यक्ष माननीय एडवोकेट श्रीहरी बागल साहेब यांचा जाहीर पाठिंबा. मराठा मुक मोर्चाच्या आंदोलनाची सुरुवात होण्याच्या आधीपासून एडवोकेट श्रीहरी बागल यांची तशी मागणी राहिलेली आहे .अण्णासाहेब जावळे पाटील साहेब यांच्याही सभेला त्यांनी हजेरी लावून मराठा समाजाच्या हिताचे काम केले आहे व नेहमी तशी मागणी राहिली आहे मराठा मूक मोर्चा च्या आंदोलनासाठी मोर्चामध्ये अनेक समाज बांधव घेऊन हे सहभागी झाले होते स्वतः मराठा असल्याने पक्षांमध्ये बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते हे मराठा असल्याने गरीब शेतकरी कुटुंबातील सर्व कोर कमिटी असल्याने समाजाचे झालेले नुकसान हा पक्ष डोळ्याने बघू शकत नसल्याने त्यांनी राष्ट्रीय स्वराज्य सेना हा राजकीय पक्ष स्थापन करून शक्य ते समाज उपयोगी कार्य केले आहे. आज श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर विधिवत पूजा करून मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बोरवली पूर्व मुंबई येथे तातडीची बैठक घेऊन मराठा योद्धा , संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब हे सखळ मराठा समाजाचे काळीज असल्याने दादांना पाठिंबा देण्याचे ठरले . महाराष्ट्रातील येणारे सर्व मराठा व इतर समाजाचा जाहीर पाठिंबा असलेल्या ने सर्व समाजाचे बांधव यांचे भव्य असे स्वागत करून आम्ही मुंबईतले मराठा रहिवासी म्हणून त्यांना इतर सेवा पुरवण्याचे काम करणार असेही या बैठकीत ठरले आहे. विधानसभा 2024 निवडणूक राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षाने स्वबळावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी बासरी निवडणूक चिन्ह दिल्याने बासरी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती फक्त मुंबईमध्ये जवळजवळ वीस विधानसभा ठिकाणी राष्ट्रीय स्वरा सेनेने उमेदवार दिले होते समाजाने भरघोस मतांनी त्यांचा विजय करण्यासाठी प्रयत्न हि केला होता मराठा समाजाच्या मागण्या 50% च्या आत मध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण या मायबाप सरकारने जाहीर करावे तसा अध्यादेश त्वरित जाहीर करावा अन्यथा राष्ट्रीय स्वराज्य सेना येऊ घातलेली बीएमसी BMC निवडणूक व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवतील. संघर्ष योद्धा मराठ्यांचं काळीज असलेले माननीय श्री मनोज दादा पाटील साहेब यांची मुंबईमध्ये स्वागताची जय्यत तयारी चालू केलेली आहे मुंबई व परिसरातील लाखो मराठे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग होऊन आंदोलनाच्या ठिकाणी समाज उपयोगी सेवा पुरवण्याचे काम करणार आहेत. माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे सहकार्य केले तसे सहकार्य सध्याचे मुख्यमंत्री असलेले माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी करावे व सकळ मराठा समाजाला त्वरित न्याय द्यावा व मुंबई पोलीस आयुक्त साहेब माननीय पोलीस महासंचालक मॅडम यांनीही ह्या शांतता मार्गाने कायदेशीर चालू असलेले आंदोलनास सहकार्य करावे व समाजाला न्याय द्यावा . महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्वरित तोडगा काढून समाजाला न्याय द्यावा .समाजाचा रोष राग या सरकारला परवडणारा नाही याचाही या सरकारने अभ्यास करावा. शासनाने हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट त्वरित लागू करून मराठा समाजाला हक्काचे आरक्षण द्यावे सकळ मराठा समाज या सरकारला डोक्यावर घेऊन नाचेल . जय शिवराय जय शंभुराजे. - ॲड. श्रीहरी बागल.
राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (राष्ट्रीय पक्ष ) Registered by ECI ( new Delhi)
निवडणूक चिन्ह - बासरी🪈. -9820305909

0 Comments