प्रतिनिधी - (टिम कृषीदीप न्यूज )
शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक साहित्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल जिल्हा परिषद शाळा उंब्रज (मुले) ता कराड जि सातारा येथील साहित्यिक संशोधक अभ्यासक उपक्रमशील व प्रयोगशील प्राथमिक शिक्षिका सौ माधुरी सुर्यकांत जाधव - शिंदे यांना सन २०२४ वर्षाचा राज्य स्तरीय प्राईड ऑफ स्पंदन ॲवॉर्ड पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हा परिषद शाळा उंब्रज (मुले) येथील उपक्रमशील व प्रयोगशील प्राथमिक शिक्षिका सौ माधुरी सुर्यकांत जाधव -शिंदे यांनी शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत लेखन,वाचन, अंक ज्ञान व इंग्रजी विषयाचे प्रगतीसाठी ज्ञानरचनावाद, कृति युक्त शिक्षण, शैक्षणिक कृती संशोधन, समाजातील गोरगरीब मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणे,कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य संमेलन सहभाग, कविता वाचन,या बरोबरच शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक साहित्य या विविध क्षेत्रातील केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन स्पंदन एक्स्प्रेस व स्पंदन फौंडेशनने राज्य स्तरीय प्राईड ऑफ स्पंदन ॲवॉर्ड पुरस्कार जाहीर केला आहे.त्याबद्दल सौ माधुरी शिंदे-जाधव यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॅबिनेट मंत्री शंभुराजे देसाई,खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले,माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर,समसेरसिंह नाईक निंबाळकर,माजी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मनोज घोरपडे,आमदार अतुल भोसले,उध्दव दमयंती मराठी साहित्य परिषद संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम,शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे शिक्षण विस्तार अधिकारी समंत्ती देशमाने, केंद्रप्रमुख सुनंदा पाटील मुख्याध्यापक पद्मा भुते सरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामस्थ व पालक विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

0 Comments