Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्यार्थी प्रसाद शिंदे पुणे विभागात प्रथम

 

पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज

वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी ता. पंढरपूर येथील विद्यार्थी प्रसाद आप्पासाहेब शिंदे याने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले.

 जुलै 2023 मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत  600 पैकी 589 गुण मिळवून त्याने  पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर या पाच जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांमधून प्रथम  येण्याचा बहुमान मिळवला आहे.

 डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग नवी दिल्ली यांच्यामार्फत झालेल्या मूल्यांकनात सोलापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्यानेच पाच जिल्ह्यांमधून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांमधून त्याने  हे यश  संपादन केले आहे या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्याण काळे उपाध्यक्ष बाळासो काळे गुरुजी सचिव चंद्रकांत कुंभार प्राचार्य संतोष गुळवे व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement