Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डी येथे रक्तदान शिबिर संपन्न

 

५३रक्तदात्यांनी केले रक्तदान तसेच आरोग्य तपासणी व नेत्रदान तपासणीचे शिबिर आयोजन

 पंढरपूर - (टिम कृषीदीप न्यूज )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा येथे १ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने पंढरपूर तालुक्यात तसेच पंचक्रोशीत विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले असता आज दिनांक २७जुलै रोजी खर्डी येथे रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर व नेत्रदान तपासणी शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला.


ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला एक नवी दिशा दिली असे पंढरपूरचे सुपुत्र श्री अभिजीत पाटील यांचा १ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी उपक्रमाचे आयोजन होत आहे..

याप्रसंगी बोहाळी गावचे ज्येष्ठ उत्तम दादा जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले... यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता बागल मॅडम, नेत्र तपासणी तज्ञ डॉ.खांडेकर, पंढरपूर ब्लड बँकेचे शिवाजी कांबळे, श्रीमती कोंडे, खर्डी गावाचे अशोक महादेव पाटील, रामदास शामराव रोंगे, बापूसाहेब चिंतामणी रोंगे, ॲड.संजय रोंगे, वामन जाधव, भगवान भोसले, शंकर जाधव, लक्ष्मण डोंगरे, दिनकर रोंगे, विशाल रोंगे, पोपट पाटील, दत्तात्रय रोंगे, मनोहर जाधव, देविदास खुळे, तात्या पळसे, दत्तात्रय रणदिवे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement