Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानदृष्टी वाढविण्यासाठी उपक्रमशील प्रयत्न - गणेश लटके

 



पंढरपूर - ( टिम कृषीदीप न्यूज )

अंकगणीताच्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा  वाढीस लागला पाहिजे. त्यांच्यामध्ये विज्ञान दृष्टी  निर्माण व्हावी यासाठी विज्ञान अध्यापक  मंडळाच्या माध्यमातुन सर्व वरीष्ठ पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारी पदाधिकार्‍यांना सोबत घेवून विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन पंढरपूर तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे नुतन अध्यक्ष गणेश लटके यांनी केले.

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या पंढरपूर कार्यालयामध्ये पंढरपूर तालुका विज्ञान अद्यापक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी मंडळाच्या नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी नुतन अध्यक्षपदी बाभुळगाव येथील रेणुका विद्यालयाचे शिक्षक गणेश लटके यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर उपाध्यक्ष सचिन नकाते ,सचिव चंद्रशेखर केचे,  कार्याध्यक्ष विश्वास नागणे  या नूतन पदाधिकाऱ्यांचा  माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

यावेळी महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महामंडळाचे सल्लागार लक्ष्मीप्रसाद मोहिते, शिक्षक पतससंस्थेचे चेअरमन समाधान घाडगे , संचालक मारुती गायकवाड, अभिमान पवार , मुख्याध्यापक आयचित , अशोक नळे , रणजित पवार , कुरे , सौ अमळणेरकर , घनश्याम शिंदे उपस्थित होते.

पुढे बोलताना लटके यांनी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्य मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पदाधिकार्‍यांनी जी जबाबदारी टाकली आहे. ती जबाबदारी चांगल्या कामाच्या स्वरूपातुन सार्थ ठरविणार असल्याचे सांगितले.


विज्ञान अध्यापक  मंडळ उत्कृष्ट काम करेल...

 तालुक्यातील विज्ञान अध्यापक  मंडळाचे कार्य विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जेष्ठ विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सध्या निवडण्यात आलेली कार्यकारणीसुध्दा चांगले काम करून विविध उपक्रम राबवेल. तसेच विज्ञान शिक्षकांसााठी प्रभावी काम करेल.

दत्तात्रय सावंत

माजी शिक्षक आमदार

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement