Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

चेअरमन अभिजीत (आबा ) पाटील यांना सहकाराचा चौथा स्तंभ पुरस्कार प्रधान

 


सहा साखर कारखान्याचे दहा साखर कारखाने होवो - मुख्यमंत्री


 



पंढरपूर - (टिम कृषीदीप न्यूज )

पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार दि.६जानेवारी सकाळी १०:३०वा.यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे अप्रतिम मीडिया आयोजित सहकारातील चौथा स्तंभ विकास पत्रकारिता राज्य पुरस्कार वितरण आणि अप्रतिम महावक्ता २०२२-३२ रिपब्लिक टॅलेंट रियालिटी शो रिलीज शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने चा शुभारंभ व पुरस्कार सोहळा संपन्न झाला..


राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री.एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभहस्ते सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंढरपूरचे युवा नेते व डीव्हीपी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना *सहकाराचा चौथा स्तंभ* म्हणून पुरस्कार देण्यात आला..



यावेळी मुख्यमंत्री;शिंदे म्हणाले की, साखर कारखाने चालवणे सोपी गोष्ट नाही तरीही राज्यात  अर्धा डझन साखर कारखाने यशस्वीरित्या चालवत असताना हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कोरोना काळात ऑक्सिजन प्रकल्प उभारला. सहा साखर कारखान्याचे लवकर दहा साखर कारखाने व्हावे अशा शुभेच्छा देखील म मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अभिजीत पाटील यांना शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement