Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी समाधान गायकवाड, व कार्याध्यक्षपदी मोहन डावरे

 




 पंढरपूर, प्रतिनिधी

पंढरपूर येथे श्रमिकपत्रकार संघाच्या बैठकीत नुतन पदाधिकारी म्हणून अध्यक्ष समाधान गायकवाड, कार्याध्यक्ष मोहोन डावरे, उपाध्यक्ष सचिन शिंदे, उपाध्यक्ष बजरंग नागणे, खजिनदार सावता जाधव, सचिव घनश्याम शिंदे, यांची एकमतानी निवड करण्यात आली. 2022-23 सालासाठी नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या.

जेष्ठ मार्गदर्शक सिध्दार्थ ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष नवनाथ पोरे, कार्याध्यक्ष सुनिल उंबरे आदींनी आपल्या वर्षभरातील केलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा सांगितला. या पुढे मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

या निवडीच्या  वेळी शिवाजीराव शिंदे, अरूण बाबर, सतिश बागल, महालिंग दुधाळे, सचिन कांबळे, सुर्यकांत बनकर, भिमा व्यवहारे, शहाजी काळे, सुधाकर कवडे, मोहोन कोळी, उत्तम बागल, गनेश गायकवाड, सुनिल कोरके, कल्याण कुसुमडे, समाधान काळे, नितीन शिंदे आदींसह श्रमिक पत्रकार संघ पंढरपूरचे सर्वजन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement